दिवसाढवळ्या व्यावसायिकाची रोकडे असलेली बॅग चोरटयांनी केली लंपास

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- बँकेतून काढलेली रोकड एक व्यापारी दुचाकीवरून घेऊन चालला होता. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी दुचाकीवरून जात असलेल्या व्यवसायिकाकडून ही बॅग हिसकावून फरार झाले. विशेषबाब म्हणजे हि घटना भरदुपारी प्रेमदान चौक ते प्रोफेसर कॉलनी चौक रोडवर ही घटना घडली.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. याबाबत अधिक माहिती अशी कि, सोमवारी दुपारी नगर-मनमाड रोडवरील स्टेट बँकेतून सावेडीतील व्यवसायिक किशोर पोखरणा यांनी पाच लाख रूपयांची रक्कम काढली.

रक्कम असलेली बॅग दुचाकीवर घेऊन ते घरी जात असताना वरदळीचे ठिकाण असलेल्या प्रेमदान चौक ते प्रोफेसर कॉलनी चौक रोडवर पाठीमागून आलेल्या दोघांनी पोखरणा यांच्याकडील बॅग हिसकावली. चोरटयांनी दुचाकीवरूनच हि बॅग हिसकवल्याने व्यापारी पोखरणा यांच्या दुचाकीचे नियंत्रण सुटले आणि ते दुचाकीसह खाली कोसळले.

त्यांना काही कळेपर्यंत तर चोरटे पुढे प्रोफेसर कॉलनी चौकातून तोफखाना पोलीस ठाण्यासमोरून वेगात गेले. घटनेची माहिती तोफखाना पोलिसांनी स्टेट बँकेसह बॅग पळविलेल्या रोडवरील विविध दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे. पाळत ठेऊन बॅग पळविल्याचा संशय पोलिसांना आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts