ताज्या बातम्या

Ahmednagar news : राधाकृष्ण विखे पाटील मंत्रिपदाच्या शर्यतीत, कोणते खाते मिळणार; अनेक चर्चांना उधाण

Ahmednagar news : नुकतंच राज्यात सत्तांतर झाले असून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. याचबरोबर भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

मात्र आतापर्यंत दुसरे कोणतेही खाते वाटप करण्यात आलेले नाही. नवीन सरकारमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे गटातून अनेक जण मंत्रिपदासाठी दावेदार आहे. या दावेदारांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातून (Ahmednagar district) राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil

) देखील मंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे.  

त्यांना नुकतंच नवीन विधानसभामध्ये पहिल्या रांगेत स्थान मिळाल्याने आता त्यांच्याकडे कोणती खाती दिली जाणार तसेच पक्षाकडून त्यांच्यावर काय जबाबदारी सोपवली जाणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून आहे. विखे पाटील यांच्याकडे सहकार आणि कृषी क्षेत्रातील कामाचा प्रदीर्घ अनुभव असल्याने त्यांना मोठे मंत्री पद मिळणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यामधून होत आहे. 

राधाकृष्ण विखे पाटील यांचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध चांगले आहे आणि नुकतंच राज्यात झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये त्याचा मोठा योगदान होता अशी देखील चर्चा जोराने होत आहे.

त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटीलयांच्यावर मंत्रिपद आणि जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्यासोबतच पुढील निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविली जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्याचे प्रभारी म्हणून यापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झाली आहे.

मात्र, तेव्हा ते विरोधीपक्ष नेते होते, आता त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद असल्याने पक्षाकडून दुसऱ्या नेत्यावर नगरची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे स्थान भक्कम आहे. त्याला छेद देण्यासाठी भाजपकडून ताकद लावण्याची तयारी सुरू केली आहे. त्याची चिन्हे मंत्रिपदे आणि जबाबदाऱ्या वाटपातून दिसण्याची शक्यता आहे.

नगर जिल्ह्यातून विधान परिषदेवर नुकतेच निवडून गेलेले प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांचेही नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहे. त्यासोबतच पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे (Monica Rajale) यांनाही महिला लोकप्रतिनिधी म्हणून मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे. मात्र, आता पदे देताना पुढील निवडणुकीची गणिते डोळ्यासोमर ठेवूनच निर्णय होणार असल्याचे सांगितले जाते.  

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts