ताज्या बातम्या

उन्हाळ्यात राज्यातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मिटणार; याबाबत अजित पवारांचा कौतुकास्पद निर्णय….

3 years ago

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Maharashtra news :-शेतीक्षेत्रात काळाच्या ओघात अनेक नवनवीन तंत्रज्ञान विकसित होऊ लागलेत. आता हायड्रोपोनिक्स (Hydroponic Farming) शेतीच्या माध्यमातून मातीविरहित शेती (Soilless farming) करायला देखील सुरुवात झाली आहे.

मात्र अद्याप पर्यंत तसेच भविष्यात देखील पाण्याविना शेती होऊ शकत नाही हे सर्वांनाच ठाऊक आहे. शेतीमध्ये पाणी (Water Management) हा एक अविभाज्य आणि महत्त्वपूर्ण घटक आहे.

भारतीय शेती (Indian Agriculture) मुख्यता पावसाळ्याच्या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र, रब्बी हंगामात (Rabbi Season) व उन्हाळी हंगामात शेतकरी बांधवांना शेती करण्यासाठी तसेच मुक्या प्राण्यांना पिण्यासाठी पाण्याची नेहमीच तारांबळ उडत असते.

यामुळे शेतकरी बांधवांचे उन्हाळ्यात पाण्यासाठी नेहमीच प्रमुख धरणांच्या आवर्तनाकडे लक्ष लागलेले असते. या वर्षात मात्र शेतकरी बांधवांना उन्हाळी हंगामात ठाकरे सरकारने (Thackeray Government) मोठी सौगात दिली आहे, यामुळे बळीराजा सुखावला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, निरा डाव्या आणि उजव्या कालव्यातून जून महिन्याच्या शेवटपर्यंत दोन आवर्तने सोडण्यात येणार आहेत. यामुळे राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानात शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, राज्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढतच आहे. सध्या राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात तापमानात मोठी वाढ झाली असून सदर विभागात तापमान चाळीशी पार झाले आहे. यामुळे उन्हाळी हंगामातील पिकांना पाण्याची कमतरता भासणार असल्याचे चित्र तयार होत होते.

या दरम्यान, ठाकरे सरकारच्या एका निर्णयामुळे तापमानात वाढ होत असतांना देखील शेतकऱ्यांच्या गालावर स्मितहास्य खुलले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, महा विकास आघाडी सरकारमध्ये मंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या समस्येवर नुकतीच एक बैठक पार पडली.

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निरा डाव्या आणि उजव्या कालव्यातून आवर्तने सोडण्याबाबत याच बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. ठाकरे सरकारच्या या मोठ्या निर्णयामुळे बारामती, इंदापूर, फलटण, खंडाळा, पंढरपूर, माळशिरस या तालुक्यातील शेतकऱ्यांची उन्हाळी हंगामात पाण्यासाठी वाढत असलेली चिंता मिटली आहे.

या परिसरातील शेतकऱ्यांना येत्या काही दिवसात उन्हाळी हंगामासाठी मुबलक पाण्याचा साठा उपलब्ध होणार असल्याचे चित्र आता बघायला मिळत आहे.. गत खरीप हंगामात पावसाने चांगली हजेरी लावल्याने या उन्हाळी हंगामात पाण्याची टंचाई भासणार नाही हे ठरलेलंच होतं.

असे असताना देखील या उन्हाळी हंगामात तापमानाचा पारा दिवसेंदिवस उच्चांकी वाढ नमूद करत असल्यामुळे शेतकरी बांधवांना उन्हाळी हंगामात पाण्याची टंचाई भासणार अशी चिंता भेडसावत होती. परंतु सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या मनात सुरू असलेल्या या घालमेलास ब्रेक लागला आहे.

पुणे जिल्ह्याच्या (Pune District) नीरा देवधर, भाटघर, वीर, गुंजवणी या जलाशयात मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा उपलब्ध आहे. नीरा उजव्या आणि डाव्या कालव्यातून सध्या पाणी सुरू आहे. यातच आता नीरा उजव्या आणि डाव्या कालव्यातून अजून एक आवर्तन सरकार सोडणार असल्याच्या निर्णयामुळे बळीराजा आता बिनधास्त झाला आहे.

यावरून आता स्पष्ट झाले आहे की, जून महिन्याच्या शेवटपर्यंत नीरा उजव्या आणि डाव्या कालव्यातून दोन आवर्तने शेतकऱ्यांना मिळणार आहेत. यामुळे उन्हाळी हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळणार असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा मुळासकट मिटला आहे.

एवढेच नाही जून महिन्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवल्यास पाणी सोडण्याची सूचना देखील यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी केली आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उन्हाळी हंगाम सुखाचा जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Recent Posts