Mobile : सध्या स्मार्टफोनची गरज आणि मागणी वाढली आहे. त्यामुळे अनेक कांपन्या मार्केटमध्ये त्यांचे नवनवीन फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करत आहेत. आता तर या कंपन्यांचे 5G स्मार्टफोन मार्केटमध्ये आले आहेत. याच स्मार्टफोनमुळे सर्व जग मुठीत आले आहे.
कोणतेही काम असो ते स्मार्टफोनच्या मदतीने पूर्ण होते. युवा वर्ग स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. जसे स्मार्टफोनचे फायदे आहेत तसेच त्याचे तोटे आहेत. अनेकांना याची माहिती असूनही त्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे त्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात.
आपल्या दैनंदिन जीवनाचा स्मार्टफोन हा एक अविभाज्य भाग बनला आहे. अनेकांना स्मार्टफोनला स्वतःपासून वेगळे ठेवता येत नाही. काही लोक ते नेहमी सोबत घेऊन जातात. इतकेच काय तर ते टॉयलेटमध्ये फोन सोबत घेऊन जातात.
आरोग्यासाठी आहे घातक
याबाबत आरोग्य तज्ज्ञांचे असे मत आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या खिशात वायरलेस नेटवर्कशी जोडलेला फोन ठेवता तेव्हा तुमच्या शरीराला 2 ते 7 पट रेडिएशनचा सामना करावा लागतो. सध्याच्या काळात फोन रेडिएशन हे कर्करोगाचे एक कारण मानले जात आहे.
हे रेडिएशन तुमची डीएनए रचना बदलू शकते.यामुळे नपुंसकत्वाचा धोका निर्माण होतो. अनेकांना शर्टच्या वरच्या खिशात फोन ठेवण्याची सवय असते. यामुळे हृदयाशी निगडित समस्या उद्भवू शकते. तर फोन पॅन्टच्या खिशात ठेवला तर त्याचे रेडिएशन तुमची हाडे कमकुवत करू शकतात.
कोणत्या खिशात फोन ठेवणे आहे उत्तम
हे लक्षात घ्या की फोन कोणत्याही खिशात ठेवू नका. फोन ठेवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो पर्स किंवा बॅग. जर तुम्हाला तसे करता येत नसेल तर मागच्या खिशात ठेवा. परंतु, हे लक्षात ठेवा की त्याची मागील बाजू वर राहिली पाहिजे. ज्यामुळे शरीर फोनच्या किमान रेडिएशनच्या संपर्कात येईल. इतकेच नाही तर झोपतानाही फोन दूर ठेवत जा.