पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते पुण्यात (Pune) तब्ब्ल २९ ठिकाणी उदघाटने करण्यात येणार आहेत. त्यामुळे अजित पवार येणाऱ्या काळातील महापालिका निवडणुकीसाठी (Municipal Election) वातावरण निर्मित करताना दिसून येतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
ओबीसी आरक्षणामुळे महापालिका निवडणूक लांबणीवर पडलेल्या दिसत आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांना महापालिका निवडणुकीची तयारी करण्यासाठी वेळ सापडला असल्याचे दिसत आहे.
महापालिका निवडणुकी पर्यंतचा काळ हा सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्वाचा मनाला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे देखील महापालिका निवडणुकीसाठी वारे निर्माण तयार करताना दिसत आहे.
अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात रविवारी अनेक ठिकाणी उदघाटने (Inaugurations) करण्यात येणार आहेत. एक दोन नव्हे तब्बल २९ ठिकाणी उदघाटने करण्यात येणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिनिधींनी केलेल्या विकास कामांचे लोकार्पण अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला आहे. अजित पवार यांच्या कामाला सकाळची ७ वाजता सुरुवात होते हे तर सर्वांनाच माहिती आहे.
त्यामुळे रविवारी अजित पवार येत्या महापालिका निवडणुकांबाबत काय बोलणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचेही रविवारी पुण्यात कार्यक्रम होणार आहेत.