अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- केडगाव येथील निशा लॉन येथे लसीकरण केंद्राचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक यांना लस देऊन करताना मा.सभापती मनोज कोतकर समवेत नगरसेवक राहुल कांबळे,
गणेश ननवरे, अनिल ठुबे, महिला बालकल्याण समिती सभापती लताताई शेळके, मच्छिंद्र कोतकर, विजय सुंबे, उमेश कोतकर, बाबासाहेब वायकर, जालिंदर कोतकर, अशोक कोतकर, आरोग्य कर्मचारी आदीसह नागरिक उपस्थित होते.
माजी सभापती मनोज कोतकर म्हणाले की केडगाव येथील आरोग्य केंद्रावर मोठ्या प्रमाणात लस घेण्यासाठी गर्दी होत आहे या गर्दीमुळे अनेक नागरिकांना चक्रा मारावा लागत आहे
त्यामुळे पाठपुरावा करून लसीकरण केंद्र चालू करण्याची मागणी केली असताना लसीकरण केंद्र चालू करण्यात आले आहे यामुळे जी नागरिकांची गैरसोय होत होती ती होणार नाही व केडगाव
येथील नागरिकांना विनंती करण्यात आलेली आहे की सर्वांनी लस घ्यावी या लसीमुळे कोरोणावर थोडीफार का होईना आपण मात करणार आहे व योग्यरीत्या लसीकरण सर्वांचे होणार असल्याचे मनोज कोतकर म्हणाले.