ताज्या बातम्या

भारताने मिरची उत्पादनात चीनलाही टाकले मागे; मिरची उत्पादनात भारत अव्वल स्थानी

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2022 Krushi News :-  भारत देशाला मसाल्यांचा देश असे म्हणूनही ओळखले जाते. तर भारतामध्ये मिरची उत्पादन ही मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जागतिक मिरचीच्या व्यापारात भारतीय मिरचीच्या निर्यातीचा वाटा ५० टक्क्यांहून अधिक आहे, चीन हा त्याचा सर्वात जवळचा स्पर्धक आहे, परंतु चीन दुसऱ्या स्थानावर राहात, भारत हा मिरची उत्पादन अव्वल स्थानी आहे.

मिरची शेती ही फायदेशीर मानली जाते. देशात मसाला शेतीवर शेतकरी जास्त भर देत असून मिरची शेती ही त्यापैकी एक आहे.

हिरवी मिरची आरोग्यासाठी चांगली असून त्यामध्ये जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. मिरचीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्याची ताकद देखील आसते.

मिरचीत पोटॅशियम मॅग्नेशियम आणि लोहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. मिरचीचा वापर वेदना कमी करणे,डोकेदुखी,अर्क संधिवात, जळजळ आणि मज्जातंतूवेदना कमी करण्यासाठी केला जातो.

देशातील एकूण मसाल्याच्या निर्यातीमध्ये मिरचीचा मोठा हिस्सा असून नॅशनल चिली टास्कफोर्सच्या मते सुमारे 6,500 कोटी रुपये प्रतिवर्ष तर मसाल्यांची एकूण निर्यात सुमारे 21,500 कोटी रुपयांची आहे.

तर भारतात गेल्या वर्षी एकूण मसाला निर्यात 27,193 कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. त्या निर्यातीत मिरचीचा ही समावेश होता.गेल्या 10 वर्षांत निर्यातीमध्ये प्रमाण आणि मूल्य या दोन्ही बाबतीत चांगली वाढ दिसून आली.

मिरची निर्यातीत भारत जागतिक आघाडीवर आहे. आणि आंध्र प्रदेश हे व्यापारी पीक उत्पादक राज्यांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts