India News Today : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी UPSC च्या नवीन अध्यक्षाच्या (New President of UPSC) नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच त्यांनी याप्रकरणी केंद्र सरकारवर (Central Goverment) जोरदार हल्ला चढवला आहे. मनोज सोनी (Manoj Soni) यांना केंद्रीय लोकसेवा आयोग-यूपीएससीचे नवे अध्यक्ष बनवल्यानंतर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
एक एक करून घटनात्मक संस्था नष्ट होत आहेत, असे ट्विट त्यांनी केले. सोनी यांच्या नियुक्तीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना राहुल यांनी यूपीएससीचे केंद्रीय प्रचारक संघ आयोग असे नामकरण केले आणि सरकार संस्था नष्ट करत असल्याचे सांगितले.
ट्विटरवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, संघ प्रचारक संघ आयोग. ते म्हणाले की, एक एक करून संस्था नष्ट करून संविधान नष्ट केले जात आहे.
यासोबतच त्यांनी एका वृत्तसंस्थेकडून प्रसिद्ध झालेली बातमीही पोस्ट केली आहे, ज्यामध्ये मनोज सोनी यांना यूपीएससीचे नवे अध्यक्ष बनवण्यात आल्याचे लिहिले आहे. सोनी हे भाजप (BJP)-आरएसएसच्या (RSS)जवळचे आहेत.
याआधी रविवारी राहुल गांधी यांनी दावा केला होता की, सरकारच्या निष्काळजीपणामुळे कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात ४० लाख भारतीयांचा मृत्यू झाला. त्याच वेळी, त्यांनी पुन्हा एकदा सर्व मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली.
राहुलने ट्विटरवर न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालाचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यात दावा केला आहे की जगभरात कोविड मृत्यूची आकडेवारी सार्वजनिक करण्याच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) प्रयत्नांना भारत अडथळा आणत आहे.