Indian Railway: भारतीय रेल्वेची (Indian Railways) गणना जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कमध्ये (world’s largest rail networks) केली जाते.
भारतीय रेल्वेत दररोज करोडो लोक प्रवास करतात. प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी रेल्वेकडून वेळोवेळी नियमांमध्ये बदल केले जातात, जेणेकरून त्यांना प्रवास करताना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये.
आता भारतीय रेल्वे प्रवासी गाड्यांमध्ये डिजिटल डिस्प्ले बोर्ड (digital display boards
) बसवण्याचा विचार करत आहे.रेल्वेच्या या पावलानंतर पॅसेंजर ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. ही सुविधा आल्यानंतर प्रवाशांना प्रवास करताना ट्रेन (train) कुठून जात आहे हे कळू शकणार आहे. पुढे कोणते स्टेशन येणार आहे? रेल्वेच्या या पाऊलामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
ही सुविधा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना ट्रेनचा लाइव रनिंग स्टेटस घेता येणार आहे. याशिवाय ट्रेन आता कुठून जात आहे, याचीही माहिती मिळणार आहे.
पॅसेंजर गाड्यांमध्ये डिजीटल डिस्प्ले बोर्ड सुविधा सुरू केल्याने प्रवाशांना ट्रेनची लाइव्ह रनिंग स्टेटसही पाहता येणार आहे. याशिवाय डिजिटल डिस्प्ले बोर्डवरून समाजकंटकांपासून संरक्षणाबाबत वेळोवेळी अलर्टही देण्यात येणार आहे.
भारतीय रेल्वे सर्व नवीन वंदे भारत (Vande Bharat), तेजस (Tejas), हमसफर (Humsafar), एसी(AC), इकॉनॉमी (Economy) , ईएमयू (EMU) आणि मेमू (MEMU) ट्रेनच्या डब्यांमध्ये डिजिटल डिस्प्ले बोर्ड बसवण्याची योजना आखत आहे.
या डिजिटल डिस्प्ले बोर्डची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तो जीपीएस प्रणालीशी (GPS facility) जोडला जाणार आहे. ही सुविधा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना रेल्वेचे थेट चालू स्थिती पाहण्यासाठी मोबाइल अॅप वारंवार उघडण्याची गरज भासणार नाही.
ट्रेनमध्ये बसवण्यात आलेल्या डिजिटल डिस्प्ले बोर्डवरून प्रवाशांना क्षणाक्षणाला अपडेट मिळत राहतील. जीपीएस सुविधेसाठी सॅटेलाईट कम्युनिकेशन नेटवर्क सिस्टीम रेल्वे नेटवर्कशी जोडण्यात आली आहे. यामुळे, प्रवाशांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय ट्रेनच्या थेट धावण्याच्या स्थितीबद्दल माहिती मिळेल.