ताज्या बातम्या

Indian Railways : सावधान! रेल्वेने प्रवास करत असाल तर चुकूनही सोबत घेऊ नका ‘या’ वस्तू, नाहीतर तुरुंगातच साजरा करावी लागेल दिवाळी

Indian Railways : देशभरात रेल्वेचे (Train) मोठे जाळे पसरले आहे. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास (Travel by train) करत असतात. सध्या सणासुदीचा हंगाम (Festive season) सुरु आहे.

त्यामुळे रेल्वेने प्रवास करत असताना काही वस्तू घरीच ठेवा, नाहीतर यंदाची दिवाळी (Diwali in 2022) तुम्हाला तुरुंगातच (Jail) साजरी करावी लागेल.

ट्रेनने प्रवास करणार असाल तर. अशा परिस्थितीत, ट्रेनमध्ये ज्वलनशील आणि स्फोटक पदार्थ (Explosives) सोबत घेऊ नका.

दिवाळी आणि छठपूजेच्या निमित्ताने ट्रेनमध्ये फटाके घेतले तर, आगीचा धोका लक्षणीय वाढतो. त्यामुळे सहप्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो. असे करताना पकडले गेल्यास दंडासह तुरुंगात जावे लागू शकते.

अलीकडेच, पश्चिम रेल्वेने (Western Railway) एका ट्विटद्वारे सांगितले आहे की, गॅस सिलिंडर, सिगारेट, स्टोव्ह आणि फटाके यांसारख्या ज्वलनशील पदार्थांसह ट्रेनमध्ये प्रवास करू नका. हा दंडनीय गुन्हा आहे.

रेल्वे कायद्याच्या कलम 164 नुसार ट्रेनमध्ये ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणे हा दंडनीय गुन्हा आहे, अशी माहिती ट्विटमध्ये देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत तुम्ही ट्रेनमधून प्रवास करत असाल तर विसरूनही अशी चूक करू नका.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts