ताज्या बातम्या

Indian Railways : जर तुम्ही ट्रेनमधून प्रवास करत असाल तर ‘या’ गोष्टी जाणून घ्या, नाहीतर तुरुंगात जाऊ शकता

Indian Railways : सर्वात स्वस्त प्रवासापैकी रेल्वेचा (Railways)  प्रवास मानला जातो, त्यामुळे देशातील लाखो नागरिक दररोज रेल्वेने प्रवास (Travel by train) करतात. रेल्वेही नागरिकांच्या हितासाठी वेगवेगळ्या सुविधा राबवत असते.

रेल्वेने प्रवास करत असताना काही नागरिकांना रेल्वेच्या नियमांबाबत (Railway Rules) कसलीच माहिती नसते. त्यामुळे नागरिकांनी जर चुकून रेल्वेच्या नियमाचे उल्लंघन केले तर त्यांना परिणामी तुरुंगात (Jail) जावे लागेल.

भारतीय रेल्वेमध्ये प्रवास (Travel in Indian Railways) करताना रॉकेल, कोरडे गवत, स्टोव्ह, गॅस सिलिंडर (Gas cylinder), माचिस, फटाके, रॉकेल यांसारख्या वस्तू सोबत नेऊ नका. या वस्तूंमधून आग पसरण्याची शक्यता खूप जास्त आहे.

या गोष्टी ट्रेनमध्ये नेण्यास मनाई आहे. आग पसरवणाऱ्या या गोष्टी तुम्ही ट्रेनमध्ये घेतल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

याशिवाय रेल्वेच्या परिसरात धुम्रपान करण्यास मनाई आहे. असे केल्याने तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. याशिवाय तुम्हाला दंडही भरावा लागू शकतो.

ट्रेनमध्ये प्रवास करताना विनाकारण साखळी ओढू नये. विनाकारण रेल्वेची साखळी ओढणे हा गुन्हा आहे. असे केल्यास तुम्हाला दंड आणि तुरुंगवास होऊ शकतो. जर तुम्ही ट्रेनने प्रवास करणार असाल तर तुम्हाला या नियमांची माहिती असणे गरजेचे आहे.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts