अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-केडगांव जागरूक नागरिक मंचाच्या वतीने कोरोना काळात निर्भिडपणे प्रशासनास, राजकारण्यांस सद्यस्थिती बद्दल अवगत करण्यात भाग पाडणारे लेखन
तसेच निष्पक्ष आणि लोक जागृतीच्या पत्रकारिते बद्दल जागरूक पत्रकारिता सन्मानाचे वितरण रविवारी 4 एप्रिल रोजी करण्यात आले.
तर यावेळी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले तसेच उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला, मंचच्या वतीने कोरोना काळात करत असलेल्या कामाबद्दल यामागे पोलीस कर्मचारी,
आरोग्य कर्मचारी ,सफाई कर्मचारी , रूग्णवाहिका सेवा कर्मचारी, अग्निशामक दल कर्मचारी यांचे मनोबल सन्मानाच्या माध्यमातून वाढवण्याचा प्रयत्न म्हणुन त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी केडगाव प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष समीर मणियार, नगर पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश गुंड , पत्रकार प्रकाश चव्हाण, सी न्युज मराठी वृत्तवाहिनीचे शुभम पाचारणे, भारत पवार , अमोल गायकवाड , विजय घोगरे ,
तेजस शेलार , सचिन शिंदे, प्रसाद शिंदे, विक्रम लोखंडे यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक किशोर पाटील यावेळी उपस्थित होते. प्रास्तावीक मंचचे अध्यक्ष विशाल पाचारणे यांनी केले .
याप्रसंगी प्रसाद पाटसकर , पुनम तानवडे, जालिंदर शिंदे , अक्षय शिंदे , प्रविण पाटसकर यांच्यासह अनेक जण या वेळी उपस्थित होते.