नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांचा करोना योद्धा म्हणून पाच लाखांचं विमा कवच

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  करोना काळात कोपरगांव नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांनी कोरोना योद्धे म्हणून काम केले. तसेच यंदाच्या दुसऱ्या लाटेत भयाण परिस्थिती निर्माण झाली आहे.

यातच नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा विचार करून या कर्मचाऱ्यांना करोना योद्धा म्हणून पाच लाखांचं विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ऑनलाईन पार पडलेल्या या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले आहे.

नुकतीच कोपरगाव नगरपरिषदेची स्थायी समितीची सभा ऑनलाईन पार पडली. या सभेमध्ये नगरपरिषदेमार्फत एच.आर.सी.टी स्कॅनींग मशीन,ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर, अद्यावत कार्डीयाक अँम्बुलन्स तसेच नगरपरिषदेच्या विविध विभागांतर्गत येणार्‍या विकास कामांना मंजुरी दिल्याची

माहिती उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, भाजपा गटनेते रविंद्र पाठक व शिवसेना गटनेते योगेश बागुल यांनी दिली. राज्यात करोनाच्या महामारीमुळे बाधीत झालेल्या गोरगरीब कुटुंबातील नागरिकांना नगरपरिषदेमार्फत आरोग्यविषयक पुरेशा सुविधा पुरविण्यात आलेल्या नाही.

त्यातच करोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे अनेकांच्या जीवावर बेतले आहे..यामुळे नगरपरिषदेकडे आरोग्य विषयक सुविधा शहरवासियांना पुरविण्यात याव्यात अशी मागणी होऊ लागली होती.

त्यानुसार ऑनलाईन सभेमध्ये ठेवलेल्या सर्व विषयांना मंजुरी देऊन या माध्यमातून कोपरगांवकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य पाऊल उचलले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts