अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- खा.सुजय विखे यांच्या ताब्यात असलेल्या डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखाना कामगार वसाहतीमधील खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा तातडीने सुरळीत न केल्यास येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा
गुरुवार दि 29 जुलै रोजी कामगार वर्गाने राहुरीचे नायब तहसीलदार गणेश तळेकर यांना निवेदनाद्वारे दिला आहे. तनपुरे कारखाना व्यवस्थापणाने थकीत वीजबिल न भरल्याने गेल्या ५ दिवसापासून कारखाना कॉलनीतील वीजपुरवठा महावितरणने खंडीत केला आहे.वीजपुरवठा त्वरित सुरळीत करावा
अशी मागणी आज कामगार बांधवांनी नायब तहसीलदार गणेश तळेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत न केल्यास 3 ऑगस्ट रोजी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा
सुरेश लोखंडे, सुनील काळे गुरू, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र लांडगे, रफिक सय्यद,चंद्रकांत कराळे, कारभारी खुळे, मच्छिंद्र सूर्यवंशी,सीताराम नालकर आदिंसह कामगार बांधवांनी दिला आहे.