Interest rate on FD : जर तुम्ही कॅनरा बँकेचे (Canara Bank) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण या बँकेने मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ (Interest rate hike) केली आहे.
सणासुदीच्या काळात (Festival season) या बँकेने व्याजदरात (Canara Bank Interest rate) वाढ केली आहे. बँकेच्या या निर्णयामुळे गुंतवणूकदारांना (Canara Bank Investors) चांगलाच फायदा होईल.
सध्या, बँक सात दिवस ते 45 दिवसांत परिपक्व होणाऱ्या मुदत ठेवींसाठी (FD) 3.25 टक्के आणि 46 दिवस ते 90 दिवसांत परिपक्व होणाऱ्यांसाठी 4.25 टक्के व्याजदर देते. 91 दिवस ते 179 दिवसांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर (Interest rate) आता 4.5 टक्के आहे.
180 ते 269 दिवसांच्या मुदतीच्या मुदत ठेवींवर आता 5.9 टक्के सार्वजनिक व्याज दर आणि 6.4 टक्के ज्येष्ठ नागरिक व्याजदर असेल. बँक 270 दिवसांपासून ते एका वर्षापेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर सर्वसामान्यांसाठी 6 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.5 टक्के व्याजदर देत आहे.
बँक सर्वसाधारण लोकांसाठी 6.5 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7 टक्के व्याजदर एका वर्षाच्या मुदतीच्या ठेवींवर देत आहे. एक वर्षापेक्षा जास्त आणि दोन वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर आता सर्वसामान्यांसाठी 6.5 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7 टक्के दराने व्याज मिळेल.
666 दिवसांच्या मुदतीच्या मुदत ठेवींवर सर्वसामान्यांसाठी 7% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.5% दराने व्याज दिले जाईल. दोन ते तीन वर्षांच्या मुदतीच्या ठेवींसाठी, कॅनरा बँक सध्या सर्वसामान्यांसाठी 6.5% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7% दर देत आहे.
तीन वर्षांपेक्षा जास्त परंतु पाच वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर सर्वसामान्यांसाठी 6.5% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7% दराने व्याज मिळेल. पाच वर्षे किंवा त्याहून अधिक मुदतीच्या ठेवींवर व्याजदर सामान्य लोकांसाठी सात टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी साडेसात टक्के आहे.