ताज्या बातम्या

पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये एकटे पाडण्याचा डाव, पण आम्हाला चिंता…

मुंबई : राज्यसभा निवडणुचा निकाल (Results of Rajya Sabha elections) लागला असून भाजपने (Bjp) वर्चस्व राखले आहे. मात्र अशा वेळी भाजपकडून ज्या नेत्यांची नवे चर्चेत होती त्यांना उमेदवारी न देता भाजपने नवीन उमेदवार मैदानात उतरवले.

यावर शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी दैनिक सामनामधून भाजप नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी उमेदवारी न दिल्यामुळे भाजपवर जोरदार टीका केली आहे.

विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना भाजपने पुन्हा डावलले. गोपीनाथ मुंडे (gopinath munde) व पंकजा मुंडे यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवाऱ्या द्यायच्या, सत्तेची पदे द्यायची, पण पंकजा मुंडे यांना एकटे पाडायचे असे भाजपचे धोरण दिसते, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे.

तसेच देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात स्वतःची फळी उभी करायची आहे व त्या फळीत जुन्या निष्ठावान भाजप पदाधिकाऱ्यांना स्थान दिसत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य पक्षांतून आलेल्यांची मोट बांधली. त्यांना राज्यसभेपासून विधान परिषदेपर्यंत उमेदवाऱ्या सहज मिळाल्या.

सदाभाऊ खोत, पडळकर, लाड, बोंडे यांना उमेदवारी मिळते, पण खडसे यांना पक्ष सोडावा लागतो व मुंडे यांना अपमानित करून डावलले जाते, अशी घणाघाती टीकाही राऊत यांनी केली आहे.

त्याचसोबत पैगंबरांचा अपमान करणाऱ्या नूपुर शर्मांना फडणवीस फोन करून ”बेटी, चिंता मत करो!” असा धीर देतात तेव्हा आश्चर्य वाटते. ज्या नूपुर शर्मांच्या वक्तव्यामुळे देश दहशतवादी हल्ल्याच्या स्फोटकांवर उभा आहे, त्यांना एक नेता कसे काय पाठबळ देऊ शकतो? पंकजा मुंडे वाऱ्यावर आहेत व देशात अराजक माजवू पाहणाऱ्या नूपुर शर्मासारख्यांना भाजपचा राजाश्रय आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts