Toyota Urban Cruiser Hyryder: टोयोटा किर्लोस्कर मोटर (Toyota Kirloskar Motor) ने अखेर आपली आगामी मध्यम आकाराची SUV अर्बन क्रूझर हायराइडर (Urban Cruiser Hyrider) सादर केली आहे. विशेष बाब म्हणजे हायराइडर ला स्व-चार्जिंग मजबूत हायब्रिड इलेक्ट्रिक पॉवरट्रेन (Hybrid electric powertrain) सह सादर करण्यात आले आहे.
मॉडेलसाठी 25,000 रुपयांच्या टोकन रकमेवर ऑनलाइन आणि ऑफलाइन बुकिंग (Online and offline booking) सुरू करण्यात आली आहे. तरी ही SUV ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2022 मध्ये बाजारात लॉन्च केली जाईल.
मारुती आणि टोयोटा यांनी मिळून तयारी केली –
या मॉडेल्सची निर्मिती कंपनीच्या कर्नाटकातील बिदाडी प्लांटमध्ये केली जाणार आहे. ग्लॅन्झा (Glanza) आणि अर्बन क्रूझर नंतर टोयोटा-सुझुकी भागीदारी अंतर्गत हे पुढील मॉडेल म्हणून आले आहे, जे मारुती सुझुकी बलेनो (Maruti Suzuki Baleno) आणि मारुती सुझुकी ब्रेझा यांच्या संबंधित रिबॅज केलेल्या आवृत्त्या आहेत.
विशेष म्हणजे, हायराइडर आपला प्लॅटफॉर्म, डिझाइन घटक, वैशिष्ट्ये आणि इंजिन मारुती विटारासोबत शेअर करेल. दोन्ही मॉडेल सुझुकी आणि टोयोटा यांनी त्यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत संयुक्तपणे विकसित केले आहेत.
स्पर्धा –
मध्यम आकाराच्या एसयूव्ही स्पेसमध्ये, नवीन टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर Hyundai Creta, Kia Seltos, Skoda Kushaq आणि Volkswagen Taigun या गाड्यांना टक्कर देईल. मारुती सुझुकीची आगामी नवी विटारा एसयूव्ही टोयोटाच्या नव्या एसयूव्हीलाही आव्हान देईल.
सेल्फ चार्जिंग स्ट्राँग हायब्रिड इलेक्ट्रिक पॉवरट्रेन –
2022 टोयाटा अर्बन क्रूझर हायराइडर स्व-चार्जिंग मजबूत हायब्रिड इलेक्ट्रिक पॉवरट्रेनने सुसज्ज असेल. यासह कंपनीच्या जागतिक स्व-चार्जिंग तंत्रज्ञानाने भारतातील मास मार्केट विभागात प्रवेश केला आहे.
अर्बन क्रूझर हायराइडर वर उपलब्ध असलेला आणखी एक पॉवरट्रेन पर्याय म्हणजे निओ ड्राइव्ह. SUV ला टोयोटा हायब्रिड सिस्टम (THS) आणि ई-ड्राइव्ह ट्रान्समिशनशी जोडलेले 1.5-लिटर इंजिन मिळते, जे 68kW आउटपुट आणि 122 Nm टॉर्क जनरेट करते.
हे 59kW मोटर आउटपुट आणि 141Nm टॉर्क निर्माण करते. इंजिनचे एकत्रित पॉवर आउटपुट 85kW आहे.