ताज्या बातम्या

APY : नवीन वर्षाच्या सुरुवातीला करा ‘या’ योजनेत गुंतवणूक, महिन्याला मिळतील 10 हजार रुपये

APY : प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना ही केंद्र सरकारची सर्वात लोकप्रिय झालेली योजना आहे. योजनेतंर्गत गुंतवणूक करून उतारवयात तुम्ही तुमचा खर्च भागवू शकता. आतापासूनच या योजनेत गुंतवणूक करा.

जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट कार्यालयाला भेट देऊ शकता. तसेच योजनेचे अॅप उपलब्ध आहे.नवीन वर्षाच्या निमित्ताने सरकारच्या या योजनेत गुंतवणूक करा

या योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही भारतीय नागरिकाला यामध्ये गुंतवणूक करता येते. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी, तुमचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे.

2015 मध्ये ही योजना भारत सरकारने सुरू केली होती. वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत नोंदणी केली तर तुम्हाला दरमहा 210 रुपये गुंतवावे लागतील.

जेव्हा तुम्ही 60 वर्षांचे व्हाल तेव्हा तुम्हाला महिन्याला पाच हजार रुपये पेन्शन तसेच जर तुम्ही तुमच्या पत्नीसह या योजनेत गुंतवणूक केली तर 60 वर्षानंतर पती-पत्नी दोघांनाही दहा हजार रुपये पेन्शन मिळेल.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे योजनेत अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. यामध्ये नोंदणी करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तुम्ही https://enps.nsdl.com/eNPS/NationalPensionSystem.html वर जाऊन या योजनेसाठी नोंदणी करू शकता.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: APY

Recent Posts