Investing Tips : गुंतवणूकदारांनो! ‘हा’ आहे कोणतीही जोखीम न घेता पैसे दुप्पट करण्याचा मार्ग, समजून घ्या गुंतवणुकीचे सूत्र

Investing Tips : तुम्हाला कोणतीही गोष्ट खरेदी करायची असेल तर तुमच्याकडे पैसे असावे लागतात. काही वस्तू घेण्यासाठी खूप पैशांची गरज असते, अनेकांकडे एकाच वेळी हे पैसे असतात असे नाही. त्यामुळे अनेकजण गुंतवणूक करतात.

काही शेअर मार्केट, बँक एफडी किंवा सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करतात. अनेकांना कमी वेळेत जास्त परतावा पाहिजे असतो. जर तुम्हालाही जास्त परतावा पाहिजे असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कोणतीही जोखीम न घेता तुम्ही पैसे दुप्पट करू शकता.

आता तुम्ही म्युच्युअल फंडांद्वारे तुमची कमाई वाढवू शकता यात, महत्त्वाचे म्हणजे यात तुमचा पैसा वाढेल आणि धोका देखील कमी राहू शकतो. अलीकडच्या काळात, तज्ञांचा असाही विश्वास आहे की एखाद्या व्यक्तीला कमी जोखीम पत्करून लार्ज कॅप फंडांमध्ये गुंतवणूक करता येते. तसेच इतर फंडांच्या तुलनेत या फंडांमध्ये जोखीम कमी प्रमाणात घ्यावी लागते. तुम्हाला यात प्रत्येक महिन्याला 500 रुपये गुंतवणूक करता येते.

मिळेल उत्तम परतावा

अलीकडच्या काळात, लहान-मोठे सर्व प्रकारचे गुंतवणूकदार त्यांच्या कमाईचा काही भाग म्युच्युअल फंडामध्ये गुंतवत असतात. खरंतर म्युच्युअल फंडात गुंतवलेले तुमचे पैसे खरे तर अप्रत्यक्षपणे शेअर बाजारात गुंतवण्यात येतात.

एकंदरीतच यात तुमची जोखीम कमी होते कारण तुम्हाला ज्या कंपनीद्वारे तुम्ही म्युच्युअल फंडात पैसे गुंतवत असाल तेथील तज्ज्ञ तुमचे पैसे शेअर मार्केटमध्ये मोजून गुंतवत असतात. लार्ज कॅप कंपन्या स्थिर राहत असतात त्यामुळे त्यांच्यातील जोखीम देखील खूप कमी आहे.

म्युच्युअल फंडामध्ये पैसे एफडी किंवा आरडीपेक्षा जास्त नफा देत असतात. जर आत्तापर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकायची झाली तर म्युच्युअल फंडातून मिळणारा सरासरी परतावा 15 टक्के इतका आहे. परंतु हे लक्षात घ्या की हा आकडा वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो. मात्र यात तुमचा धोका कमी असेल.

हे आहेत काही उत्तम म्युच्युअल फंड

काही म्युच्युअल फंडांनी विविध गुंतवणूक अॅप्सद्वारे चांगला परतावा दर्शविला आहे. यात HDFC लार्ज आणि मिड-कॅप फंड, ICICI प्रुडेन्शियल लार्ज आणि मिड-कॅप फंड, मोतीलाल ओसवाल लार्ज आणि मिड-कॅप फंड, क्वांट लार्ज आणि मिड-कॅप फंड आणि बंधन कोअर इक्विटी फंड यांचा समावेश आहे.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts