Investment Schemes : सर्वोत्तम योजना! 10 हजारांच्या गुंतवणुकीवर मिळेल 32.54 लाखांचा शानदार परतावा

Investment Schemes : सध्या गुंतवणुकीसाठी अनेक योजना उपलब्ध आहेत. प्रत्येक योजनेमध्ये वेगवेगळे फायदे आणि व्याज मिळते. अनेकजण सर्वात जास्त परतावा देणाऱ्या आणि कोणतीही जोखीम न घ्याव्या लागणाऱ्या योजनेत गुंतवणूक करतात. अनेकजण सरकारी योजना, बँकेत किंवा एफडीमध्ये गुंतवणूक करतात.

अनेक सरकारी योजनांमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता, ज्यात तुम्हाला चांगला परतावं मिळेल. सरकारची अशीच एक योजना आहे ज्यात तुम्हाला 10 हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर 32.54 लाख रुपयांचा शानदार परतावा मिळेल. सरकारची ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना आहे. यात तुम्हाला ७.१ दराने व्याज मिळेल. जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती.

पीपीएफ योजनेच्या व्याजदराबद्दल सांगायचे झाले तर सरकार या योजनेमध्ये ७.१ टक्के दराने व्याज देत आहे. या योजनेची सर्वात खास गोष्ट म्हणजे यात तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला अनेक फायदेही मिळतात. तसेच तुम्हाला या योजनेत गुंतवलेल्या रकमेचा लाभ १५ वर्षांनंतर मिळतो. तसेच 15 वर्षानंतर, या गुंतवणुकीचा कालावधी आणखी 5 वर्षांसाठी वाढवता येतो.

किती करता येईल गुंतवणूक ?

तुम्हाला पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच PPF स्कीममध्ये कमीत कमी 500 रुपये गुंतवणूक करता येते. या योजनेमध्ये तुम्ही वार्षिक आधारावर 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. तुम्हाला सलग 15 वर्षे गुंतवणुक प्रक्रिया सुरू ठेवावी लागते. त्यामुळे तुम्हाला भविष्यात मोठा निधी निर्माण तयार करता येईल.

असे मिळवा 32.54 लाख रुपये

या योजनेमध्ये तुम्ही 15 वर्षांसाठी मासिक 10,000 रुपये गुंतवले तर तुम्हाला 32.54 लाख रुपये मिळतील. योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला या योजनेत तुमचे खाते उघडावे लागणार आहे. खाते चालू केल्यानंतर तुम्हाला मासिक 10,000 रुपये वाचवावे लागतील तसेच 1 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल. गुंतवणूक 15 वर्षांसाठी करावी लागेल. तुम्ही सध्याच्या व्याजदराच्या आधारे ती जोडली तर 15 वर्षांच्या मुदतीनंतर तुमच्याकडे एकूण 32,54,567 रुपये निधी असणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts