Investment Tips : गुंतवणूकदारांनो.. अशापद्धतीने गुंतवा पैसे, मिळतील महिन्याला 2 लाख रुपये

Investment Tips : सध्या प्रत्येकजण गुंतवणूक करतात. कारण ही गुंतवणूक कधी फायद्याची ठरेल हे सांगता येत नाही. बहुतांश लोक जास्त परतावा आणि कोणतीही जोखीम नसणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. गुंतवणूक करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात, तरच तुम्हाला त्याचा लाभ होऊ शकतो. जर तुम्ही अशापद्धतीने पैसे गुंतवले तर तुम्हाला महिन्याला 2 लाख रुपये मिळतील.

समजून घ्या संपूर्ण गणना

हे लक्षात घ्या की प्रत्येक महिन्याला 2 लाख रुपये पेन्शन मिळवण्यासाठी, तुमच्या NPS कॉर्पस परिपक्वतेवर 4.02 कोटी रुपये असणे खूप महत्त्वाचे आहे. समजा आपण असे गृहीत धरले की एकूण कॉर्पस 20 वर्षानंतर 6% परतावा देऊ शकतो. अशा परिस्थितीत यावर तुम्हाला एकूण 40 टक्के वार्षिकी खरेदी करावी लागणार आहे. याचा अर्थ असा आहे की, तुम्हाला वार्षिकी खरेदी करण्यासाठी 1.61 कोटी रुपये वापरावे लागणार आहेत. त्यानंतर 60 वर्षांचे झाल्यावर तुमच्याकडे 2.41 कोटी रुपयांचा निधी असेल.

अशी मिळावा 2 लाख रुपयांची पेन्शन

तर दुसरीकडे, जर तुम्हाला दर महिन्याला पेन्शन भरण्यासाठी पुरेसा चांगला परतावा मिळत नसल्यास तुम्ही करमुक्त रक्कम डेट इन्स्ट्रुमेंट्समध्ये किंवा डेट आणि इक्विटीमध्ये गुंतवणूक करू शकता. इतकेच नाही तर तुम्ही वार्षिकी खरेदी करण्यासाठी एकूण कॉर्पसपैकी 40 टक्के वापरले तर तुम्हाला 80,398 रुपये मासिक पेन्शन मिळू शकते. तुम्हाला 6 टक्के रिटर्नवर डेट इन्स्ट्रुमेंटमधून मासिक 1,20,597 रुपये मिळतील. अशाप्रकारे तुम्हाला एकूण गुंतवणुकीवर 2,00,995 रुपये मासिक पेन्शन सहज मिळू शकते.

20 वर्षात मिळेल जबरदस्त परतावा

NPS वेबसाइटनुसार, समजा जर तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी गुंतवणूक सुरू करताच, तुम्हाला पुढच्या एकूण 20 वर्षांसाठी NPS मध्ये मासिक 52,500 रुपये जमा करावे लागणार आहेत. यात जवळपास 50 टक्के आणि त्यापेक्षा जास्त इक्विटी एक्सपोजर असू शकते, जे तुम्हाला 20 वर्षांच्या दीर्घ कालावधीत उत्तम परतावा देते. 10 टक्के वार्षिक परतावा गृहीत धरले तर, एकूण NPS कॉर्पस रुपये 4.02 कोटी असणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts