Multibagger Stock : जर तुम्हीही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर जरा ही बातमी काळजीपूर्वक वाचा. जर तुमच्याकडे बीपीसीएलचा शेअर असेल तर तुम्ही लखपती होऊ शकता. कारण या शेअरने आपल्या गुंतवणूदारांना जबरदस्त परतावा दिला आहे.
याची खासियत म्हणजे या शेअरने दीर्घ मुदतीत तेजी दाखवलेली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे काही वर्षांपूर्वी या शेअरची किंमत 12 रुपये इतकी होती. तर आज या शेअरची किंमत 333 रुपये इतकी आहे. त्यामुळे जर तुमच्याकडेही हा शेअर असेल तर तुम्हीही मालामाल होऊ शकता.
बीपीसीएल शेअर
बीपीसीएलने त्यांच्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. या शेअरची 13 ऑक्टोबर 2000 रोजी बंद किंमत रु. 12.50 होती. परंतु, त्यानंतर या शेअरच्या किमतीत सतत वाढ होत गेली. हा शेअर डिसेंबर 2017 मध्ये 500 रुपयांच्या पुढे गेला. 12-13 रुपयांवरून 500 रुपयांपर्यंत वाढ होणे ही गुंतवणूकदारांसाठी खूप मोठी गोष्ट आहे.
या शेअरची आजची किंमत
परंतु, त्यानंतर या शेअरमध्ये काही प्रमाणात चढ-उतार होताना दिसत आहेत. सध्या हा शेअर 300 रुपयांच्या वर व्यवहार करत असून आज BPCL ची बंद किंमत NSE वर 333.75 रुपये इतकी आहे.
गुंतवणूकदारांना मिळतील लाखो रुपये
समजा, जर एखाद्या गुंतवणूकदारांने 23 वर्षांपूर्वी हा शेअर विकत घेतला असेल तर तर त्या गुंतवणूकदाराला 1 लाख रुपयांना 8000 बीपीसीएल शेअर्स मिळाले असते. आज या 8000 शेअर्सची किंमत 333 रुपये दराने 26.64 लाख रुपये इतकी आहे.