iPhone 11 Pro Max : सध्या सणासुदीचा हंगाम सुरु आहे. फ्लिपकार्टने एक शानदार सेल आणली आहे. या सेलमधून तुम्ही स्मार्टफोन खूप स्वस्तात खरेदी करू शकता. ज्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकते.
या सेलमधून तुम्ही आता iPhone 11 Pro Max एकूण 55 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. पण लवकरात लवकर तुम्ही या सेलचा लाभ घ्यावा लागणार आहे, कारण उद्या ही सेल संपणार आहे. जाणून घ्या संपूर्ण ऑफर.
स्वस्तात खरेदी करा iPhone
आनंदाची बाब म्हणजे Flipkart सध्या Apple iPhone 11 Pro Max वर मिडनाईट ग्रीन कलर आणि 64 GB स्टोरेजसह शानदार सवलत देत आहे. किमतीचा विचार केला तर त्याची मूळ किंमत रु 1,09,900 आहे. परंतु Flipkart सध्या फक्त Rs 95,699 मध्ये Rs 14,201 च्या डिस्काउंटवर ऑफर देत आहे.
या ऑफर्सचा फायदा घेऊन तुम्हाला iPhone ची किंमत आणखी कमी करता येईल. या बँकेच्या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही 1500 रुपयांपर्यंत सवलत मिळवू शकता. इतकेच नाही तर फ्लिपकार्ट फोनवर 39,150 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देत आहे.
जर तुम्ही या दोन्ही ऑफरचा पुरेपूर फायदा घेतला तर iPhone ची किंमत 54,049 रुपये असणार आहे. म्हणजेच तुम्हाला हा फोन 1.10 लाख रुपयांच्या मूळ किमतीसह 55 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल.
जाणून घ्या खासियत
या iPhone मध्ये (6.5-इंच) सुपर रेटिना XDR डिस्प्ले दिला आहे. हाय-एंड स्मार्टफोन A13 बायोनिक चिप प्रोसेसरद्वारे समर्थित असून तो बॅटरीच्या आयुष्यासह उर्जा कार्यक्षमता वाढवतो.फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये कंपनीने तीन 12-मेगापिक्सलचे रियर कॅमेरे दिले आहेत.
सेल्फीसाठी 12-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा 4K व्हिडिओ रेकॉर्ड करतो. हे लक्षात घ्या की फोनमध्ये 5G सपोर्ट उपलब्ध नसेल. याच्या सुरक्षिततेसाठी, फोनमध्ये फेस आयडी सपोर्ट उपलब्ध आहे.