iPhone 12 : संधीचं करा सोनं! पहिल्यांदाच iPhone 12 वर मिळतेय खूप मोठी सवलत

iPhone 12 : नुकताच Apple ने आपली iPhone 15 सीरिज लाँच केली आहे. या सीरिजमध्ये एकूण 4 मॉडेलचा समावेश आहे. या फोनला ग्राहकांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये कंपनीने जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन दिली आहेत.

कंपनीने काही दिवसांपूर्वी iPhone 12 हा फोन भारतीय बाजारात लाँच केला होता. याची मूळ किंमत 49,999 रुपये इतकी आहे. काहींचे बजेट कमी असल्याने या किमतीत फोन खरेदी करणे शक्य होत नाही. परंतु आता तुम्ही तो खरेदी करू शकता.

कारण आता पहिल्यांदाच फ्लिपकार्ट सेलमध्ये हा फोन 35,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येत आहे. हे लक्षात घ्या की ही सेल काही दिवसांसाठी असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर या सेलचा लाभ घ्या. नाहीतर तुम्हाला नंतर तो मूळ किमतीत खरेदी करावा लागेल.

35,000 रुपयांपेक्षा खरेदी करा iPhone 12

किमतीचा विचार केला तर Flipkart च्या लँडिंग पेजनुसार, iPhone 12 ची किंमत 38,999 रुपये इतकी असणार आहे. जी 3,000 रुपयांपर्यंत किंमत कमी करण्यासाठी ग्राहकांना बँक ऑफरचा लाभ घेता येईल. त्यामुळे iPhone 12 ची किंमत 35,999 रुपयांपर्यंत आणखी कमी होऊ शकते.

इतकेच नाही तर 3,000 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊन, इच्छुक खरेदीदारांना या फोनची किंमत 32,999 रुपयांपर्यंत खाली आणता येईल. परंतु एक्सचेंज ऑफरचा लाभ घेण्यापूर्वी हे लक्षात ठेवा तुमचे जुने मॉडेल चांगल्या स्थितीत असावे. iPhone 12 ची मूळ किंमत 49,999 रुपये इतकी आहे.

iPhone 13 ची किंमत

विक्रीच्या किंमती उघड करत असताना Flipkart ने आयफोन 13 च्या किंमतीचा कोणताही उल्लेख केला नाही, परंतु एका अहवालानुसार, या मॉडेलवर 30 हजार रुपयांपेक्षा जास्त सवलत मिळेल. परंतु ग्राहकांना 40 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत iPhone 13 देखील खरेदी करता येईल. Flipkart ने उघड केलेल्या किंमतीच्या श्रेणीत बँक ऑफर आणि एक्सचेंज बोनससह प्रभावी किंमत समाविष्ट आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts