iPhone 13 : नुकतीच iPhone 15 सीरिज लाँच झाली आहे. या फोनला चांगली मागणी आहे. अशातच तुम्ही आता iPhone 13 हा मूळ किमतीपेक्षा खूप स्वस्तात खरेदी करू शकता. यावर तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकते. तुम्ही आता Amazon च्या अधिकृत साइटवरून iPhone 13 खूप कमी किंमतीत खरेदी करू शकता.
तुम्हाला आता iPhone 13 59,900 रुपयांऐवजी 50,249 रुपयांना खरेदी करता येणार आहे. इतकेच नाही तर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ते 2,497 रुपये प्रति महिना EMI वर खरेदी करता येईल, म्हणजेच 2500 रुपयांपेक्षा कमी खर्च करून तुम्ही नवीन आयफोन खरेदी करू शकता.
Apple iPhone चे चाहते जगभरात आहेत, तुम्ही आता स्वस्तात नवीन iPhone 15 खरेदी करू शकतात. परंतु असे अनेकजण आहेत जे नवीन आयफोन आल्यानंतर प्रतीक्षा करतात ज्यामुळे जुन्या आयफोनची किंमत कमी होईल, त्यामुळे ते खरेदी करू शकतील. तुम्हीही या रेंजमध्ये येत असाल आणि जुन्या आयफोनची किंमत कमी होण्याची वाट पाहत असल्यास आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
या फोनच्या कॅमेर्याबद्दल बोलायचे झाले तर, सर्व कंपनीच्या कॅमेर्यांचा दर्जा उत्तम आहे. परंतु, या iPhone 13 मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. कंपनीकडून याला 12 मेगापिक्सेलचा मुख्य बॅक कॅमेरा आणि फ्लॅश लाईटसह 12 मेगापिक्सेलचा दुसरा अल्ट्रा वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. तर त्याच वेळी, फोनमध्ये 12 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा उपलब्ध असे, हे लक्षात घ्या.
कंपनीचा iPhone 13 हा 5G फोन असून तो IP68 रेटिंगसह येतो, याचा अर्थ हा iPhone पाणी आणि धूळ प्रतिरोधक सह येईल. या फोनच्या पॉवरसाठी बॅटरीबद्दल बोलत असताना iPhone 13 ची बॅटरी 19 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक प्रदान करण्याचे वचन देते.