iPhone 13 : जगभरात आयफोनचे अनेक चाहते आहेत. कंपनीच्या सर्वच फोनला चांगली मागणी असते. परंतु इतर फोनप्रमाणे या फोनची किंमत जरा जास्त असते. प्रत्येकाचे बजेट इतके असतेच असे नाही. त्यामुळे अनेकांना आयफोन खरेदी करता येत नाही.
परंतु आता तुम्ही Apple चे iPhone 13 हे मॉडेल मूळ किमतीपेक्षा स्वस्तात खरेदी करू शकता. ज्यामुळे तुमची हजारोंची बचत होईल. Amazon Great Indian Festival Sale दरम्यान तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. जाणून घ्या संपूर्ण ऑफर.
होईल हजारोंची बचत
Apple च्या वेबसाइटनुसार, iPhone 13 128GB स्टोरेज असणाऱ्या मॉडेलची किंमत 59,900 रुपये तर 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 69,900 रुपये आणि 512GB स्टोरेज मॉडेलची किंमत 89,900 रुपये इतकी आहे. याचा असा अर्थ की आगामी Amazon Great Indian Festival सेलमध्ये iPhone 13 त्याच्या वास्तविक किंमतीपेक्षा 20,000 रुपयांपर्यंत खूपच कमी किमतीत उपलब्ध होईल. हे लक्षात घ्या की iPhone 13 हे मॉडेल Apple ने 2021 मध्ये लाँच केले होते.
सोडू नका अशी संधी
आता तुम्हाला Amazon Great Indian Festival Sale दरम्यान सर्वात कमी किमतीत iPhone 13 खरेदी करता येईल. नुकतेच कंपनीने टीझर इमेजद्वारे संकेत दिले आहेत की आयफोन 13 हे मॉडेल 40 हजार रुपयांपेक्षा स्वस्तात उपलब्ध असणार आहे.
परंतु कंपनीने नेमकी किंमत जाहीर केलली नाही. हे लक्षात ठेवा या किंमतीमध्ये बँक ऑफर आणि अतिरिक्त एक्सचेंज बोनस ऑफरचा समावेश आहे. त्यामुळे स्वस्तात आयफोन खरेदी करण्याची संधी सोडू नका.
अतिरिक्त बोनस
ज्या ग्राहकांकडे जुने डिव्हाइस एक्सचेंज करण्यासाठी आहे, त्यांना अॅमेझॉनने सांगितल्याप्रमाणे अतिरिक्त सवलत मिळू शकते. जी अदलाबदल करण्याच्या फोनच्या किंमतीपेक्षा जास्त असणार आहे. समजा तुमच्याकडे एक्सचेंज साठी फोन नसेल, तुम्ही बँक ऑफरची निवड करू शकता.
या मॉडेल्सवर डील्स उपलब्ध
हे लक्षात घ्या की ही डील फक्त मर्यादित काळासाठी असणार आहे. या सेलमधून तुम्ही आयफोन 13 शिवाय, ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 2023 दरम्यान अॅमेझॉनकडून iPhone 14, iPhone 14 Plus, आणि iPhone 14 Pro सारख्या इतर iPhone मॉडेल्सवर प्रचंड सवलत मिळू शकते.