iPhone 13 : कंपनीकडून ग्राहकांना मोठं गिफ्ट! ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करता येणार iPhone 13, पहा नवीन किंमत

iPhone 13 : Apple ने नवीन iPhone 15 सीरिज लॉन्च केली आहे. जर तुम्ही येत्या काळात iPhone 13 खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता तुम्हाला मूळ किमतीपेक्षा खूप स्वस्तात हा फोन खरेदी करता येणार आहे.

कंपनी प्रत्येक वर्षी नवीन मॉडेल्स लॉन्च केल्यानंतर जुन्या स्मार्टफोन मॉडेल्सची किंमत कमी करत असते. अशातच आता कंपनीने iPhone 13 ची किंमत 10,000 रुपयांनी कमी केली आहे. तुम्हाला आता तो स्वस्तात खरेदी करता येईल. तुम्ही यावर मिळणारी अतिरिक्त सवलत आणि ऑफर मिळविण्यासाठी Amazon आणि Flipkart सारख्या वेबसाइटवर फोनची किंमत पाहू शकतात. पहा नवीन किंमत

जाणून घ्या iPhone 13 ची नवीन किंमत

कंपनीने भारतात iPhone 13 च्या सर्व स्टोरेज व्हेरियंटची किंमत 10,000 रुपयांनी कमी करण्याच्या मोठा निर्णय घेतला आहे. जाणून घेऊयात सर्व मॉडेल्सच्या नवीन किमती.
> 128GB व्हेरिएंटची किंमत 69,900 रुपये इतकी होती परंतु आता त्याची किंमत 59,900 रुपये इतकी आहे.
> 256GB व्हेरिएंट ज्याची किंमत 79,900 रुपये होती परंतु आता त्याची किंमत 69,900 रुपये इतकी आहे.
>512GB व्हेरिएंटची ज्याची किंमत 99,900 रुपये इतकी होती परंतु आता त्याची किंमत 89,900 रुपये इतकी आहे.

जाणून घ्या iPhone 13 ची शानदार फीचर्स

डिस्प्ले: कंपनीकडून iPhone 13 मध्ये 6.1 इंच स्क्रीन सुपर रेटिना XDR डिस्प्ले देण्यात आला आहे.
प्रोसेसर: A15 चिप iPhone 13 मध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.
कॅमेरा: iPhone 13 मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. यामध्ये 12MP मुख्य बॅक कॅमेरा, फ्लॅश लाइटसह दुसरा 12MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा असेल. तर त्याच वेळी, फोनमध्ये 12MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.
अंतर्गत स्टोरेज: या फोनमध्ये 128 GB, 256 GB आणि 512 GB अंतर्गत स्टोरेज दिले आहे.
OS: iकंपनीच्या या शानदार फोनमध्ये iOS 15 येतो परंतु त्याला iOS 16 अपडेट देखील मिळत आहे.
बॅटरी: फोनची बॅटरी 19 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक प्रदान करते.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts