iPhone 14 : संधीचं करा सोनं! iPhone 15 लॉन्च होताच 17 हजारांनी स्वस्त झाला iPhone 14, पहा ऑफर

iPhone 14 : जर तुम्हीही स्वस्तात आयफोन खरेदी करण्याची संधी पाहत असाल तर तुमच्यासाठी एक शानदार ऑफर आहे. ज्यामुळे तुम्हाला मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत iPhone 14 खरेदी करता येईल. नुकताच लेटेस्ट आयफोन 15 लाँच झाला आहे.

तुम्ही आता फ्लिपकार्टवरून iPhone 14 17 हजार रुपयांनी स्वस्त खरेदी करू शकता. या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला लवकरात लवकर या सेलचा लाभ घ्यावा लागणार आहे. कारण ही ऑफर काही दिवसांसाठीच असणार आहे. सेल संपल्यानंतर तुम्हाला हा फोन ,मूळ किमतीत खरेदी करावा लागणार आहे.

कंपनीने या फोनमध्ये शानदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन दिली आहेत. त्यामुळे स्वस्तात iPhone 14 खरेदी करण्याची संधी गमावू नका. नाहीतर तुम्हाला पश्चाताप करावा लागणार आहे. तसेच iPhone 13 वरही शानदार ऑफर मिळेल. फ्लिपकार्टवर ही ऑफर आहे. जाणून घ्या सविस्तर.

जाणून घ्या iPhone 14 वर मिळणार ऑफर

किमतीचा विचार करायचा झाला तर फ्लिपकार्टवर iPhone 14 चा लाल रंगाचा प्रकार 79,900 रुपयांच्या लॉन्च किमतीच्या तुलनेत 66,999 रुपयांच्या किंमतीला सूचीबद्ध करण्यात आला आहे. इतकेच नाही तर HDFC बँक कार्डद्वारे पेमेंट करत असणाऱ्या ग्राहकांना 4000 रुपयांच्या अतिरिक्त सवलतीचा लाभ देखील मिळत आहे, त्यानंतर iPhone 14 ची किंमत तब्बल 62,999 रुपयांपर्यंत खाली येते. या ऑफरसह, iPhone 14 वर ग्राहकांना एकूण 16,901 रुपयांची शानदार सवलत मिळत आहे.

हे लक्षात घ्या की, iPhone 14 वर एक्सचेंज ऑफरचा फायदा स्वतंत्रपणे उपलब्ध असून समजा तुमच्याकडे एक्सचेंज करण्यासाठी जुना स्मार्टफोन असेल तर, त्याचे मॉडेल आणि स्थितीनुसार तुम्हाला या फोनवर हजारो रुपयांची सहज सवलत मिळू शकते.

iPhone 13 वरही मिळेल शानदार ऑफर

समजा तुम्हाला आयफोन 13 खरेदी करायचा असेल तर तो फ्लिपकार्टवर 56,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लिस्ट केला आहे. तसेच HDFC बँक कार्ड वापरकर्त्यांसाठी, फ्लिपकार्टवर मिळणाऱ्या शानदार डिस्काउंटनंतर या स्मार्टफोनची प्रभावी किंमत 54,999 रुपये इतकी होत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts