iPhone 14 Offer : काही दिवसांपूर्वी Apple ने iPhone 14 या फोन लाँच केला होता. या फोनची मूळ किंमत 79,900 रुपये इतकी आहे. अनेकांचे बजेट कमी असल्यामुळे त्यांना हा फोन खरेदी करता आला नाही.
परंतु तुमच्याकडे आता हाच फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. त्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकते. अशी भन्नाट संधी Amazon आणि Flipkart वर मिळत आहे. कंपनीने या फोनमध्ये अप्रतिम फीचर्स दिली आहेत. काय आहेत?जाणून घ्या
Amazon वर मिळत आहे ऑफर
अॅमेझॉन इंडियावर Apple iPhone 14 ची किंमत 71,999 रुपये इतकी आहे. समजा तुम्ही एचडीएफसी बँकेच्या डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डने यासाठी पैसे भरले तर तुम्हाला त्यावर 4,000 रुपयांची झटपट सवलत मिळत आहे.
त्यानंतर या फोनची किंमत 66,999 रुपये इतकी असेल. तसेच तुम्हाला या फोनवर एक्सचेंज ऑफरचा लाभ घेता येईल. जर तुम्ही तुमच्या जुन्या फोनची देवाणघेवाण केली तर तुम्हाला iPhone 14 वर 22,688 रुपयांपर्यंत सवलत मिळेल.
फ्लिपकार्टवर मिळत आहे ऑफर
फ्लिपकार्टबद्दल बोलायचे झाल्यास या ठिकाणी iPhone 14 ची किंमत 69,999 रुपये इतकी आहे. जर तुम्ही एचडीएफसी बँकेच्या डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डने यासाठी पैसे भरले तर तुम्हाला त्यावर 4,000 रुपयांची सवलत मिळेल. त्यामुळे या फोनची किंमत 65,999 रुपये इतकी असेल. एक्सचेंज ऑफरमध्ये, तुम्हाला या फोनवर 29,250 रुपयांपर्यंत सवलत मिळेल.
विजय सेल्स
विजय सेल्समध्ये iPhone 14 ची किंमत रु.70,990 इतकी आहे. परंतु आता तुम्हाला HDFC बँकेच्या कार्डांवर 4,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो. त्यानंतर या फोनची किंमत 66,990 रुपये असणार आहे.
ऍपल स्टोअर ऑफर
Apple Store वर iPhone 14 ची किंमत 79,900 रुपये ठरवण्यात आली आहे. समजा तुम्ही एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केले तर तुम्हाला 5,000 रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते. त्यानंतर या फोनची किंमत 74,900 रुपये इतकी असेल.
क्रोमा ऑफर
iPhone 14 ची किंमत 71,999 रुपये इतकी असेल. जर तुम्ही HDFC बँकेच्या कार्डने पेमेंट केले तर तुम्हाला 4,000 रुपयांपर्यंत सवलत मिळेल. त्यानंतर या फोनची किंमत 67,999 रुपये इतकी असू शकते.