iPhone 15 : नुकतीच iPhone 15 सीरिज लाँच झाली आहे. अशातच Apple ने खरेदीदारांना सर्वात मोठी भेट दिली आहे. तुम्ही आता iPhone 15 मॉडेल्स खूप स्वस्तात खरेदी करू शकता. त्यावर तुमची हजारोंची बचत होईल. या फोनची प्रीबुकिंग सुरु झाली आहे. जाणून घ्या संपूर्ण ऑफर आणि किंमत.
असे क्वचितच होते की खरेदीदारांना नवीनतम आयफोन मॉडेल्सवर मोठी सवलत मिळते. याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे कंपनीने iPhone 14 लाइनअपच्या मॉडेलच्या तुलनेत आपल्या नवीन iPhone 15 मॉडेल्सच्या लॉन्च किंमतीत वाढ केली नसून आता जर तुम्हाला अॅपलचे नवीनतम डिव्हाइस खरेदी करायचे असेल तर तुम्हाला विशेष ऑफरसह 6000 रुपयांपर्यंत सवलत मिळेल. Apple India वेबसाइट शिवाय, ग्राहकांना आता कंपनीच्या दिल्ली आणि मुंबई रिटेल आउटलेटमध्ये निवडक ऑफरचा लाभ मिळणार आहे.
यांना मिळणार सवलत
Apple India ने म्हटले आहे की जर वापरकर्ते त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरून नवीनतम iPhone 15 मॉडेल ऑर्डर करत असून त्यांनी HDFC बँक कार्डद्वारे पेमेंट केले तर त्यांना 6000 रुपयांपर्यंत सवलत सहज मिळेल. तसेच अॅपलच्या अधिकृत स्टोअरला भेट देऊन नवीन आयफोन खरेदी करू इच्छित असणाऱ्या ग्राहकांनाही अशीच सवलत देण्यात येणार आहे. विनाखर्च EMI वर सवलत देऊन नवीन फोन खरेदी करता येईल. त्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होईल.
जाणून घ्या किंमत
ग्राहकांनो हे लक्षात घ्या की नवीनतम iPhone 15 मॉडेल आता 79,900 रुपयांना नाही तर ते तुम्हाला 74,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येणार आहे. तसेच ग्राहकांना 89,900 रुपयांना नाही तर ते 84,900 रुपयांमध्ये iPhone 15 Plus खरेदी करता येईल.
प्रो मॉडेल्सबद्दल सांगायचे झाले तर, सवलतीनंतर 128,900 रुपये आणि 153,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. तसेच जुन्या आयफोन मॉडेल्सवरही मोठी सवलत उपलब्ध करून देण्यात आली आहे.