ताज्या बातम्या

IRCTC Services : ट्रेनला उशीर झाल्यास IRCTC कडून प्रवाशांना ‘या’ सर्व गोष्टी मिळतात मोफत, वाचा सविस्तर

IRCTC Services : आज अनेकजण ट्रेनने (Train) प्रवास करतात. याच प्रवाशांसाठी (Passengers) एक महत्वाची बातमी आहे.

प्रवाशांना अनेकवेळा ट्रेनची बराच वेळ वाट पाहावी लागते. परंतु आता ट्रेन उशिरा (late) आली तर तुम्हाला फुकट जेवण (Free meal) मिळणार आहे. अनेकांना हा नियम माहीतच नाही.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका हक्काबद्दल सांगत आहोत. चला जाणून घेऊया ट्रेन उशीरा आल्यावर IRCTC (IRCTC) तुम्हाला कोणती सेवा मोफत (IRCTC Free Service) देते.

ट्रेन उशिरा आल्यावर IRCTC मोफत जेवण देते

तुमची ट्रेन  उशिरा धावत असेल तर आयआरसीटीसी तुम्हाला जेवण आणि थंड पेय देते. हे जेवण तुम्हाला IRCTC कडून (Indian Railway Catering and Tourism Corporation) अगदी मोफत दिले जाते.

रेल्वे सुविधांचा हक्काचा आनंद घ्या, तो तुमचा हक्क आहे. भारतीय रेल्वेच्या (Indian  Railway) नियमांनुसार, जेव्हा ट्रेन उशीरा आल्यावर प्रवाशांना IRCTC सेवांच्या खानपान धोरणांतर्गत नाश्ता आणि हलके जेवण दिले जाते.

ही सुविधा कधी उपलब्ध आहे?

आयआरसीटीसीच्या नियमांनुसार (IRCTC Rules) प्रवाशांना मोफत जेवण दिले जातात.  रेल्वे कॅटरिंग पॉलिसी अंतर्गत, जर ट्रेन दोन तास किंवा त्याहून अधिक उशीर झाली तर एक्स्प्रेस गाड्यांमधील प्रवाशांना ही सुविधा देण्यात आली आहे.

म्हणजेच शताब्दी, राजधानी आणि दुरांतो या एक्स्प्रेस गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही बातमी अत्यंत उपयुक्त ठरू शकते.

या सुविधा IRCTC द्वारे पुरविल्या जातात

त्यांच्या धोरणानुसार नाश्ता चहा किंवा कॉफी आणि दोन बिस्किटे संध्याकाळच्या स्नॅकमध्ये चहा किंवा कॉफी आणि चार ब्रेड स्लाइस असते.

तांदूळ, डाळी, लोणची यांची पाकिटे IRCTC कडून प्रवाशांना जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी दिली जातात. किंवा 7 पुर्‍या, मिक्स व्हेज/भजी, लोणच्याचे पॅकेट, मीठ आणि मिरचीचे प्रत्येक पॅकेट दिले जाते.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts