मुद्देच नसल्याने विरोधकांकडून बेजबाबदार टीका : आ. राजळे

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :-  पाथर्डी तालुक्यातील सर्वच नेते आगामी सर्व निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात पाहायला मिळत आहे. परंतु विरोधकांकडे विकासाचे कोणतेच मुद्दे नाहीत.

त्यामुळे फक्त बेजबाबदार टीका करणे. व्यासपीठ कुठलेही असू भाजप, केंद्र सरकार, मोदी, फडणवीस, मुंडे ,आमदार राजळे यांच्यावर टीका कशी करता येईल, एवढेच धोरण विरोधकांचे आहे. दुसरा कोणताच मुद्दा त्यांच्याकडे नाही, असा आरोप आमदार मोनिका राजळे यांनी केला.

तालुक्यातील चिंचपुर इजदे येथील विविध विकास कामांच्या उद््घाटनप्रसंगी आमदार राजळे बोलत होत्या.कार्यक्रमास भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड, तालुकाअध्यक्ष माणिकराव खेडकर,

माजी जि.प. सदस्य अर्जुनराव शिरसाट, सोमनाथ खेडकर, सरपंच पुष्पा विजय मिसाळ, उपसरपंच वंदना नागरगोजे, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत अकोलकर, सुभाष केकान, धनंजय बडे, जेष्ठ नेते अशोक चोरमले, जगदंब युवाप्रतिष्ठानचे प्रतीक खेडकर,

महेश अंगारखे, त्रिंबक खेडकर, भगवान दहिफळे, विनायक खेडकर, श्रीकांत खेडकर, कालिदास दहिफळे, नवनाथ खेडकर, भगवान खेडकर,अरुण मिसाळ, सुभाष खंडागळे, सतीश शिरसाट ,उपसरपंच शुभम गाडे, सतीश मासळकर, ज्ञानेश्वर खेडकर, विजय मिसाळ आदी उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts