अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:- बाळ बोठेला अटक केल्यानंतर हैद्राबाद येथून तिरंगा लावलेल्या अलिशान फॉर्च्युनर वाहनातून पारनेर पोलिस ठाण्यात दाखल झाला.
दरम्यान हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठे यास पोलिसांकडून दिल्या जात असलेल्या व्हिआयपी ट्रिटमेंटची चौकशी करण्याची मागणी रेखा जरे यांचा मुलगा रूणाल जरे यांनी केली आहे.
याप्रकरणी मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच पोलिस महासंचालकांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे सांगून येत्या ४८ तासांत बोठे याच्या बडदास्तीची चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा जरे यांनी दिला आहे.
रेखा जरे यांचा मुलगा रूणाल जरे यांनी तात्काळ माध्यमांशी संवाद साधत पोलिसांच्या या भुमिकेवर संशय व्यक्त केला. तिरंगा लावलेल्या अलिशान फॉर्च्युनर वाहनातून बोठे पारनेर पोलिस ठाण्यात येतो,
त्याच्या हातात बेडयाही नसतात, त्याच्या घरचे लोक त्याला सहजपणे भेटतात. जेवणासाठी घरचा डबा दिला जातो. त्याच्यासाठी स्ततंत्र बराकीची व्यवस्था केली जाते. हा आरोपी आहे की सरकारचा पाहुणा ? असा सवाल जरे यांनी केला आहे.