Tips For Pet Owners : अनेकांना आपल्या घरात कुत्रा पाळायला आवडते. त्याशिवाय कुत्र्यांच्या अनेक जाती उपलब्ध आहेत. त्यापैकी काही कुत्रे स्वस्तात मिळतात तर काही कुत्रे विकत घेण्यासाठी अनेक पैसे मोजावे लागतात.
घरी कुत्रा आणला तर आपण त्यांना सदस्याप्रमाणे जीव लावतो, परंतु, अनेकदा कुत्रा पाळणे खूप महागात पडते. त्यामुळे काही गोष्टी लक्षात ठेवा. नाहीतर पाळीव कुत्र्यामुळे तुम्ही अडचणीत याल.
लक्षात ठेवा या गोष्टी
नंबर 1
जर तुम्ही घरी पाळत असाल तर तुम्ही त्याला पूर्णपणे लसीकरण करून घेणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी घरी कुत्रा आणण्याअगोदर सरकारी दवाखान्यात किंवा डॉक्टरांकडे जा आणि त्याचे लसीकरण करा. जरी तो तुम्हाला किंवा इतरांना चावला तर ते स्वतःचा बचाव करण्यास मदत करू शकते.
नंबर 2
कुत्र्यांच्या काही जाती खूप क्रूर असतात. जसे की – पिटबुल, डॉबरमॅन इ. त्यामुळे तुमच्या कुत्र्याने कोणाला त्रास देऊ नये किंवा कोणालाही चावू नये, इत्यादी गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात.
नंबर 3
जर तुमच्याकडे कुत्रा असेल किंवा तुम्ही कुत्रा पाळणार असाल तर त्याला चांगल्या सवयी शिकवा. जर तुम्ही असे केले नाही तर ते तुमच्यासाठी आणि बाहेरील लोकांसाठी त्रासदायक ठरू शकते.
नंबर 4
मोबाईल, चार्जर, शूज आणि चप्पल किंवा इतर कोणत्याही महागड्या वस्तू कुत्र्यापासून लांब ठेवाव्यात नाहीतर त्या वस्तू खराब झाल्याच म्हणून समजा.