Life Hacks : पूर्वीच्या काळात स्वयंपाक घरात चुली असायच्या. सर्व स्वयंपाक हा चुलीवर केला जायचा. परंतु, आता काळ बदलला असून चुली नामशेष व्हायला लागल्या आहे. आज घरोघरी तुम्हाला गॅस कनेक्शन पाहायला मिळत आहे. सध्या इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
त्यामुळे जेवणही खूप महाग झाले आहे. याचा परिणाम गृहिणीच्या बजेटवर पडला आहे. अशातच काही घरांमध्ये गॅस सिलिंडर खूप लवकर संपतो. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. परंतु, आता काळजी करू नका या सोप्या पद्दतीने तो वाचवू शकता.
फॉलो करा या टिप्स
क्रमांक 1
अनेकजण भांडी धुतात आणि ती भांडी स्वयंपाकासाठी थेट गॅसच्या शेगडीवर ठेवतात. परंतु, असे करणे टाळावे, कारण या आधी ओले भांडे सुकते आणि नंतर अन्न शिजते. त्यामुळे तुमच्याकडून नकळत दररोज मोठ्या प्रमाणात गॅस वाया जातो.
क्रमांक 2
स्वयंपाक करण्यापूर्वी सर्व तयारी करूनच स्वयंपाक सुरू करा. कारण अनेकजण अगोदर भांडी गॅसच्या शेगडीवर ठेवतात आणि नंतर भाज्या कापतात. यामुळे मोठ्या प्रमाणात गॅस वाया जातो.
क्रमांक 3
जर तुम्हाला गॅस जास्त काळ टिकवायचा असल्यास तुमच्या गॅस सिलेंडरची गळती होते का ते तपासा. सिलिंडर नकळत हळूहळू गळत राहतो आणि गॅस लवकर संपतो. हा गॅस सिलिंडरमधून किंवा पाईपमधूनही गळू शकतो. त्यामुळे दर तीन महिन्यांनी पाईप बदला.
क्रमांक 4
अनेकजण जलद गॅस चालू करून शिवाय त्यावर कोणतीही भांडी न झाकता अन्न शिजवतात. त्यामुळे गॅस वाचवायचा असेल तर मध्यम आचेवर शिजवून भांडे झाकून ठेवा.