‘हे वक्तव्य जागे असताना केले आहे, की झोपेत असताना केले ?

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- महाविकास आघाडी सरकार व भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा कायम रंगलेला असतो . नुकतेच भाजप आमदार चंद्रकांत पाटील ठाकरे सरकार झोपेत असतानाच पडेल असे वक्तव्य केले होते.

चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. चंद्रकांत पाटलांनी‘हे वक्तव्य जागे असताना केले आहे, की झोपेत असताना केले असा प्रतिप्रश्न अजितदादांनी विचारला आहे.महाविकास आघाडी सरकारला १८महिने बोनसमध्ये मिळाले आहेत.

आता लोकं झोपत असताना कधीही सरकार पडेल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता.१८ महिन्यांपुर्वी सरकार आल्यापासून कुठल्याही क्षणी जाईल यासाठी बॅग भरुन तयार असतानाही १८ महिने त्यांना सरकार मिळाले आहे.

यामध्ये कोविड एक भाग आहे तसेच कदाचित त्यांचे नशीबही असेल. देवेंद्र फडणवीस जसे म्हणतात की, दादा झोपेतून उठल्यावर सरकार गेले होते. इतक्या अचानक गेले.. केसाने गळा कापणे म्हणतात तसे.. तसेच आताही झोपेत असताना सरकार जाईल,

चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील पत्रकारपरिषदेत म्हटले होते.महाविकास आघाडी सरकार स्थापना झालेला भाजपला बघवत नाही. आपण सत्तेत नाही आहोत हे त्यांना असह्य होता आहे.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोबत राहावे यासाठी सातत्याने अशी वक्तव्य करत असतात, जोपर्यंत तिन्ही पक्षाचे नेते निर्णय घेत नाहीत तोपर्यंत सरकार राहणार अशी माहिती अजित पवारांनी माध्यम प्रतीनिधींसोबत बोलताना दिली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts