अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-कोविड संकटामुळेच सर्वांना माणुसकी कळाली, पैसा आणि संपत्तीपेक्षाही माणसाला देव महत्त्वाचा वाटू लागला.
आरोग्याची काळजी घेतानाच भीती आणि मनाच्या दुबळेपणाला दूर करावे लागणार आहे. कोविड सेंटरमधून माणुसकीची सेवा करणारे कार्य घडू लागले.
कोविड सेंटरमधून रुग्णांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे ही सुद्धा एक माणुसकीची सेवा ठरेल, असा विश्वास समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी व्यक्त केला.
पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेाच्या पुढाकाराने विखे पाटील महाविद्यालयातील वसतिगृहात ४०० बेडचे प्रवरा कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले.
या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण कोविड नियमांचे पालन करून करण्यात आले. याप्रसंगी उद्धव महाराज मंडलिक, समाजप्रबोधनकार इंदोरीकर महाराज, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, प्रवरा संस्थेचे अध्यक्ष आमदार राधाकृष्ण विखे,
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे, प्रवरा मेडीकल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विखे पाटील, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब जेजुरकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, रवींद्र ठाकरे उपस्थित होते.
आमदार राधाकृष्ण विखे म्हणाले, ४०० बेडची उपलब्धता या केंद्रात केली. यामध्ये लवकरच ९० बेड हे ऑक्सिजन सुविधेसह तयार करण्यात येणार असून तज्ञ वैद्यकिय अधिकारी, नर्सिंग स्टाफ आणि रुग्णांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली.
यापूर्वी प्रवरा हॉस्पीटल, विखे पाटील फाउंडेशन, शिर्डी संस्थानच्या रुग्णालयातून एक हजार बेडची व्यवस्था करण्यात आली होती. पण वाढती रुग्णांची संख्या हे कोविड सेंटर सुरू करण्यात आल्याचे ते म्हणाले.