अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- भाजपने सुरू केलेल्या जलसंधारण, मागेल त्याला शेततळे या सारख्या अनेक लोकाभिमुख योजना या आघाडी सरकारने राजकीय द्वेषापोटी बंद केल्या.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सुरू केलेल्या जलसंधारण योजनेंतर्गत अनेक गावांची पाणीपातळी वाढून शेती सुजलाम सुफलाम झाली आहे.
यासारख्या अनेक योजना बंद केल्या. काही झाले की केद्रावर बोट दाखवणे हेच आघाडी सरकारचे काम आहे, अशी टीका आमदार मोनिका राजळे यांनी केली.
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंजूर असलेल्या आव्हाणे खुं येथील भगूर रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे,
युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष उमेश भालसिंग, किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष कचरू चोथे, जिल्हा उपाध्यक्ष वाय. डी. कोल्हे, सरचिटणीस भीमराज सागडे, महिला आघाडी अध्यक्ष आशा गरड, सोमनाथ कळमकर, मीनाताई कळकुंबे, महादेव पाटेकर उपस्थित होते.