Meta ने आपल्या काही युजर्सना मोठा धक्का दिला आहे. मेटाने इन्स्टाग्राम आणि फेसबुक युजर्ससाठी अॅड फ्री पेड सब्सक्रिप्शन प्लॅन आणला आहे. मार्क झुकेरबर्ग हा प्लॅन सादर करू शकतात, अशी अनेक दिवसांपासून चर्चा होती.
आता कंपनीने हे पाऊल उचलले आहे. मेटा फेसबुक आणि इन्स्टाग्राम या दोन सेवांचे सब्सक्रिप्शन देणार आहे. युरोपियन संघाच्या दबावानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यामुळे हा ऑप्शन फक्त युरोपियन युजर्ससाठी उपलब्ध असेल.
किती असेल सबस्क्रिप्शन प्लॅनचा खर्च
या प्लॅनची किंमत प्रति महिना 9.99 युरो (अंदाजे रु 885) आणि स्मार्टफोनसाठी (अँड्रॉइड आणि iOS) प्रति महिना 12.99 युरो (अंदाजे रु. 1,145) असेल. Meta ने घोषणा केली आहे की ते युरोपमधील 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या युजर्सना ऍड फ्री Facebook आणि Instagram योजना उपलब्ध करून देईल. हे प्लॅन स्वित्झर्लंड, युरोपियन युनियन आणि युरोपियन इकॉनॉमिक एरियामध्ये उपलब्ध असतील.
भारतीयांसाठी काय आहे नियोजन?
भारतामध्ये असा काही प्लॅन नाही. इन्स्टाग्राम फीडवर भारतातील युजर्सना जाहिरात दिसत राहतील. पण जर हे सब्सक्रिप्शन प्लॅन युरोपियन युनियनमध्ये लोकप्रिय झाले तर मेटा भारतातही ही सेवा सुरू करण्याची शक्यता आहे. ही किंमत काही लोकांना जास्त वाटू शकते, परंतु त्यात काही बदल किंवा इतर सुविधा ऍड केल्या जाऊ शकतात. ऍड फ्री फेसबुक आणि इन्स्टाग्राम म्हणजे आपल्या फीडमध्ये कोणत्याही जाहिराती नसतील. ऍड फ्री जरी असले तरी हे युजर्ससाठी तसेच कंपनीसाठी फायदेशीर आहे, असे मार्क झुकेरबर्ग यांनी म्हटले आहे.
फेसबुक इंस्टाग्रामची लोकप्रियता
सध्या इंस्टाग्राम व फेसबुक हे प्रचंड लोकप्रिय अँप आहेत. तरुणांमध्ये याची प्रचंड क्रेझ आहे. आज प्रत्येक तरुण हे दोन्ही अँप वापरतो. भारतामध्ये या दोन्ही अँपचे मिलियनमध्ये युजर्स आहेत. आज करमणूक , तसेच जाहिरात करणे किंवा तत्सम कारणासाठी फेसबुक व इंस्टाग्रामचा वापर केला जातो.