Jagat Seth : भारतातून सोन्याचा धूर निघत होता असे पूर्वी म्हटलं जात होते. तुम्ही देखील हे ऐकलं असेल. परंतु कोणत्या श्रीमंत लोकांमुळे देशाला हा दर्जा मिळाला होता?अनेकांना याबद्दल कसलीच माहिती नाही. देशात असा एक व्यक्ती होता जो इंग्रजांना कर्ज देत होता.
ज्यांच्याजवळ इतका पैसा होता, सर्वात महत्त्वाचे म्हणजे इंग्रज शासक बनून नाही तर व्यापारी बनून त्यांच्याकडून कर्ज घेत होते. शिवाय ते स्वतः नाणी बनवत होते. परंतु त्यांच्याकडून एक चूक झाली आणि ते अडचणीत आले. कसे ते जाणून घ्या.
इंग्रजांची होती सत्ता
भारताची समृद्धी पाहून ब्रिटिशांनीही या ठिकाणी वर्षानुवर्षे राज्य केले. ब्रिटीश राजवटीमध्ये भारताचा जागतिक व्यापारात मोठा वाटा होता. जगत सेठ हे ब्रिटीश काळातील एक मोठे व्यापारी आणि बँकर होते, ते लोकांना व्याजावर पैसे देत होते. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले आहे की, त्यावेळी त्यांच्याकडे असणारी संपत्ती आजच्या चलनानुसार तब्बल 2 लाख कोटी रुपये इतकी आहे.
ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकृत इतिहासकार रॉबेन ओर्मे यांनी जगत सेठना त्या काळात जगाला ज्ञात असणारे महान बँकर आणि मनी चेंजर म्हणून संबोधण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 1750 च्या दशकात त्यांची एकूण संपत्ती 14 कोटी रुपये इतकी होती.
सर्वात मोठे बँकिंग कुटुंब
इतिहासकार गुलाम हुसेन खान यांचा असा विश्वास होता की जगत सेठ यांनी 17 व्या शतकाच्या शेवटच्या तिमाहीत आपला व्यवसाय स्थापित केल्याने 18 व्या शतकापर्यंत ते कदाचित भारतातील सर्वात मोठे बँकिंग कुटुंबहोते. जगतशेठ बंगालमध्ये आर्थिक बाबतीत खूप प्रभावशाली होते. त्यांची नाणी पाडण्याची मक्तेदारी होती. त्यावेळी देशाच्या अनेक भागात जगतसेठ यांची कार्यालये होते, तेथून कर्जावर पैसे देण्याचे काम चालत होते.
व्यवसाय
आजच्या बँका ज्या पद्धतीने व्यवसाय करत आहेत काही प्रमाणात जगतसेठ यांचा व्यवसायही त्याच पद्धतीने चालत होता. भारतातील वेगवेगळ्या शहरांमधील व्यापाराला चालना देण्यासाठी त्यांनी उत्कृष्ट अंतर्गत दळणवळण व्यवस्था ठेवण्यात आली होती, ज्यात संदेशवाहक जोडण्यात आले होते. त्यांचे बँकिंग नेटवर्क कलकत्ता, ढाका, दिल्ली आणि अगदी पाटणापर्यंत होते. ‘प्लासी: द बॅटल दॅट चेंज द कोर्स ऑफ इंडियन हिस्ट्री’मध्ये सुदीप चक्रवर्ती यांनी असे लिहिले आहे की ते त्यांच्या काळातील अंबानी होते.
इंग्रजांनी बुडवले कर्ज
आज जगतसेठ किंवा त्यांच्या घराण्याचे नाव पुस्तकांमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र ज्यावेळी श्रेष्ठींचा उल्लेख येतो त्यावेळी त्यांचा उल्लेख क्वचितच होतो. यामागचे एक प्रमुख कारण म्हणजे जगतसेठ कुटुंबाची संपत्ती पूर्णपणे नष्ट झाली आहे.
कारण इंग्रजांच्या वाढत्या वर्चस्वामुळे या कुटुंबाने आपली पकड गमावली. जगतसेठने कर्ज म्हणून घेतलेले सर्व पैसे ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने बुडवले. सियार-उल-मुताखेरीनच्या मतानुसार, जगत सेठांनी सिराजविरुद्धच्या मोहिमेसाठी ब्रिटिशांना त्यांनी एकूण तीन कोटी रुपये दिले होते. हा आकडा अतिशयोक्तीपूर्ण असेल.
‘जगत हाऊस’ बनले म्युझियम
20 व्या शतकाच्या सुरूवातीला जगतसेठ कुटुंबाचे नाव नाहीसे झाले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 1723 मध्ये मुघल सम्राट मुहम्मद शाह यांनी फतेहचंद यांना जगत सेठ म्हणजेच ‘जगाचा बँकर’ ही पदवी देण्यात आली होती. जगत सेठ यांचे घर, ज्यात एक गुप्त बोगदा असून एक भूमिगत खोली आहे जिथे पैशाचे व्यवहार होत असत, जे 1980 मध्ये संग्रहालयामध्ये रूपांतरित केले गेले. हे पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद या ठिकाणी आहे.