ताज्या बातम्या

जय जवान, जय किसान, भावी सैनिकांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

Maharashtra news : केंद सरकारने नव्याने आणलेल्या अग्निपथ योजनेंतर्गंत अग्निवीर भरतीच्या विरोधात देशभरात आंदोलनांचा वणवा पेटला आहे. त्यातच आता शेतकरीही उतरले आहेत.

संयुक्त किसान मोर्चा व अखिल भारतीय किसान सभेने २४ जून रोजी देशभर तीव्र आंदोलन करण्याची हाक दिली आहे, अशी माहिती किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी दिली आहे.डॉ. नवले यांनी सांगितले, ‘सैन्य दलात सामील होऊ पाहणारे बहुतेक विद्यार्थी, युवक हे शेतकरी कुटुंबातील आहेत.

सीमेवर देशाचे रक्षण करणारे बहुतांश सैनिक गणवेशधारी शेतकरीच आहेत. संयुक्त किसान मोर्चाने यामुळेच सीमेवर लढणाऱ्या व सैन्यात भरती होऊ पाहणाऱ्या सैनिकांच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रामध्ये २४ जून रोजी किसान सभेच्या सर्व शाखा या आंदोलनात सहभागी होत आहेत. जनतेच्या लष्करीकरणाचा आपला छुपा अजेंडा संघ परिवार या माध्यमातून पुढे नेत असून यामुळे देशाची एकता, सार्वभौमत्व व लोकशाहीलाही मोठे आव्हान दिले गेले आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts