Jan Dhan Yojana : जन धन योजनेंतर्गत मिळणार अनेक फायदे, जाणून घ्या कसे मिळवू शकता यामध्ये तुम्ही लाभ ……

Jan Dhan Yojana :- प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत देशातील गरीब आणि दुर्बल घटकांना अनेक सुविधा पुरवल्या जात आहेत. तुम्हीही जन धन खातेधारक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

केंद्र सरकारकडून जनधन खातेधारकांना दरमहा हजारो रुपयांचा लाभ दिला जात आहे. वास्तविक, देशातील गरीब आणि गरजू लोकांमध्ये बँकिंग सुविधा विकसित करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती.

विशेष म्हणजे तुमच्या जनधन खात्यात शून्य शिल्लक असूनही तुम्हाला बँकेकडून 10 हजार रुपयांपर्यंतची मदत मिळू शकते.

या योजनेंतर्गत जनधन खातेधारकांना 10 हजार रुपयांच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा सरकारकडून दिली जात आहे. तसेच यापूर्वी बँकेकडून ग्राहकांना फक्त रु.5 हजार पर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा दिली जात होती. तसेच नंतर ते 10 हजार करण्यात आले आहे.

जर तुम्हाला बँकेची ओव्हरड्राफ्ट सुविधा घ्यायची असेल तर तुमचे खाते 6 महिने जुने असावे. अन्यथा तुम्हाला 10 हजार रुपयांचा ओव्हरड्राफ्ट मिळू शकणार नाही. अशा स्थितीत तुम्हाला रु.2 हजारच्या पर्यंतच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा नक्कीच मिळू शकते.

जन धन योजनेचे फायदे – या योजनेशी संबंधित काही फायद्यांबद्दल सांगायचे तर, जन धन खात्यात जमा केलेल्या रकमेवर तुम्हाला व्याजाची सुविधा मिळते.

यामध्ये तुम्ही मोफत मोबाईल बँकिंगचाही लाभ घेऊ शकता. तसेच या सरकारी योजनेतील लाभाचे पैसे थेट तुमच्या खात्यात येतात. यामध्ये 10 हजार रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्टची सुविधा देण्यात आली आहे.

यासोबतच रुपे कार्डवर 1 लाख रुपयांपर्यंतचा अपघात विमा संरक्षण देखील उपलब्ध आहे. जन धन खातेधारकाला डेबिट कार्ड देखील दिले जाते. याशिवाय तुम्ही झिरो बॅलन्सवरही खाते चालवू शकता.

यामध्ये खाते उघडण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट pmjdy.gov.in वर जाऊन अर्ज करू शकता. याशिवाय तुम्ही कोणत्याही बँकेत जाऊन हे खाते सहज उघडू शकता. एवढेच नाही तर जन धन खाते असलेले ग्राहकही श्रम योगी मानधन योजनेच्या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts