Maharashtra News:राष्ट्रवादीचे नेते आणि माजी जलसंपदा मंत्री यांच्याविरोधात इस्लामपूर न्यायालयाने एका जुन्या प्रकारणात वारंट जारी केले होते.
त्यानंतर पाटील न्यायालयात हजर झाले आणि त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. पाटील यांच्यावर पद्धतीने प्रथमच न्यायालयासमोर उभे राहण्याची वेळ आल्याचे सांगण्यात येते.पाटील यांच्याविरोधात पाच वर्षांपूर्वी जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
या प्रकरणी न्यायालयाने पाटील यांना समन्स देऊनही ते न्यायालयात हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांच्याविरोधात थेट वारंटच काढण्यात आले. त्यावर पाटील यांनी इस्लामपूर न्यायालयात उपस्थित राहून जामीन मंजुर करून घेतला.
पाच वर्षांपूर्वी झालेल्या सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पाटील यांनी शिगावमध्ये आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांच्याविरोधात मुंबई पोलीस अधिनियमानुसार जमावबंदी आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. इस्लामपूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारींच्या कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे.