JEE Advanced 2022 : विद्यार्थी सध्या जेईई अॅडव्हान्सड परीक्षेची वाट पाहत असून यासाठी 8 ऑगस्ट म्हणजेच आजपासून नोंदणी (JEE Advanced Registration) सुरू होणार आहे.
केवळ जेईई मेन्स परीक्षा (JEE Mains Exam) पास असलेले विद्यार्थी जेईई अॅडव्हान्सड परीक्षेसाठी नोंदणी करू शकतात. विद्यार्थ्यांनी नोंदणीसाठी jeeadv.ac.in या अधिकृत वेबसाइटवर 4 वाजल्यापासून अर्ज करावा.
यावेळेस एकूण 6 लाखांहून अधिक विद्यार्थी जेईई मेन 2022 सत्र-2 परीक्षेत बसले होते. यापैकी केवळ शीर्ष 2.5 लाख उमेदवार जेईई अॅडव्हान्स्डसाठी अर्ज (JEE Advanced Application) करू शकतील. नोंदणीची लिंक योग्य वेळी अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होईल.
उमेदवार 11 ऑगस्ट 2022 पर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवार 12 ऑगस्ट 2022 पर्यंत IIT JEE Advanced परीक्षेसाठी शुल्क (IIT JEE Advanced Fees) भरू शकतात.
28 ऑगस्ट रोजी दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात येणार असून 11 सप्टेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. पेपर 1 ची परीक्षा सकाळी 9 ते दुपारी 12 आणि पेपर 2 ची परीक्षा दुपारी 2.30 ते 4.30 या वेळेत होईल.
JEE Advanced 2022: अर्ज कसा करायचा