Jio 5G : नुकतीच रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारणसभा (AGM) पार पडली. रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी (Mukesh Ambani) या बैठकीत 5G सेवेची (5G service) मोठी घोषणा केली आहे.
दरम्यान, देशातील जिओला (Jio) सर्वाधिक सर्कलमध्ये 5G स्पेक्ट्रम (5G spectrum) मिळाल्यामुळे कंपनीच्या शेअर (Jio share) दरात मोठी उसळण दिसून येत आहे.
मुकेश अंबानी यांनी जाहीर केले
भारतातील दुसरे सर्वात मोठे श्रीमंत आणि रिलायन्स ग्रुपचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सोमवारी सांगितले की कंपनी नवीन आणि चांगल्या सेवा देण्यासाठी 5G तंत्रज्ञानावर (5G technology) काम करेल आणि त्यावर 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करेल.
दिवाळीपासून 5G स्पीड उपलब्ध होईल
RIL च्या 45 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित करताना अंबानी म्हणाले की, यावर्षी दिवाळीपर्यंत देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये 5G सेवा सुरू होईल. 5G स्पेक्ट्रमच्या लिलावात सर्वात मोठी बोली देखील रिलायन्स जिओने लावली होती.
अंबानी म्हणाले की, जगातील अनेक भागांमध्ये तीव्र आर्थिक ताण आहे
अंबानी म्हणाले की, जगाच्या अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या तणावादरम्यान भारत विकास आणि स्थिरतेचा दिवाबत्ती म्हणून उदयास आला आहे.
जगातील अनेक भागांमध्ये तीव्र आर्थिक ताण आहे. जागतिक जोखमींमुळे अनिश्चिततेची स्थिती निर्माण झाली आहे. अशा काळात भारत एक प्रकाश-स्तंभ म्हणून पुढे आला आहे.
जगासमोर मंदीचा धोका
अंबानी पुढे म्हणाले की, इंधन, खाद्यपदार्थ आणि खतांच्या वाढत्या किमती प्रत्येकाच्या जीवनावर परिणाम करत आहेत. वाढती महागाई आणि पुरवठा-संबंधित गतिरोध यांमुळे आज जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीचा धोका आहे.