Jio AirFiber : अखेर लाँच झाले Jio AirFiber! अवघ्या 599 रुपयांत ‘या’ शहरांना मिळणार हायस्पीड इंटरनेट

Jio AirFiber : रिलायन्स जिओने गणेश चर्तुर्थीच्या मुहूर्तावर Jio AirFiber लाँच केले आहे. कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानींनी याची 28 ऑगस्टला घोषणा केली होती. त्यामुळे कंपनीचे ग्राहक याची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर ही सेवा लाँच झाली आहे.

दरम्यान, कंपनीचे हे नवीन हॉटस्पॉट डिव्हाइस आहे. याच्या मदतीने ग्राहकांना घर किंवा ऑफिसमध्ये वायरलेस इंटरनेट सुविधा मिळणार आहे. किमतीचा विचार केला तर या प्लॅनची किंमत 599 रुपयांपासून सुरु होते. जाणून घेऊयात सविस्तर.

या शहरांना मिळणार Jio AirFiber ची सुविधा

रिलायन्स जिओने मुंबई,दिल्ली, कोलकाता, हैदराबाद, अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई आणि पुणे या ठिकाणी Jio Air Fiber सेवा प्रज्ञा करण्यात आली आहे. हे एक एकीकृत एंड-टू-एंड सोल्यूशन असून जे स्मार्ट होम सर्व्हिसेस, होम एंटरटेनमेंट आणि हाय-स्पीड ब्रॉडबँड यांसारख्या सेवा देते.

लाँच केले दोन प्लॅन

कंपनीने दोन प्रकारचे प्लॅन आणले असून यातील पहिला प्लॅन एअर फायबर आणि दुसरा एअर फायबर मॅक्स. एअर फायबर प्लॅनमध्ये ग्राहकांना 30Mbps आणि 100Mbps अशाप्रकारचे दोन प्रकारचे स्पीड प्लॅन मिळतील.

किमतीचा विचार केला तर Air Fiber 30 Mbps प्लॅनची ​​किंमत 599 रुपये इतकी आहे आणि १०० एमबीपीएस एअर फायबर प्लानसाठी तुम्हाला 899 रुपये द्यावे लागणार आहेत. दोन्ही प्लॅनमध्ये ग्राहकांना 550 पेक्षा जास्त डिजिटल चॅनेल आणि 14 मनोरंजन अॅप्स मिळतील.

या कंपनीने 100 Mbps स्पीडसह आणखी एक प्लॅन सादर केला असून त्याची किंमत 1199 रुपये प्रति महिना असून या प्लॅनसह सर्व चॅनेल आणि अॅप्ससाठी सपोर्ट नाही तर तुम्हाला नेटफ्लिक्स, अॅमेझॉन आणि जिओ सिनेमा सारख्या प्रीमियम अॅप्समध्ये प्रवेश मिळतील.

एअरफायबर मॅक्स प्लॅन

ज्या ग्राहकांना जास्त इंटरनेट स्पीड पाहिजे असेल त्यांच्यासाठी ‘एअर फायबर मॅक्स’ प्लॅन उत्तम आहे. या अंतर्गत, कंपनीने 300 Mbps ते 1000 Mbps म्हणजेच 1 Gbps पर्यंतचे तीन प्लॅन सादर केले असून 300 Mbps स्पीड प्लॅनची ​​किंमत 1499 रुपये प्रति महिना आणि 500 Mbps स्पीड प्लॅनची ​​किंमत 2499 रुपये इतकी आहे.

1 Gbps स्पीड असणाऱ्या प्लॅनची ​​किंमत 3999 रुपये आहे. 550 पेक्षा जास्त डिजिटल चॅनेल, 14 मनोरंजन अॅप्स आणि नेटफ्लिक्स, अॅमेझॉन आणि जिओ सिनेमा सारखी प्रीमियम अॅप्स सर्व योजनांसह उपलब्ध असणार आहेत.

जिओ एअर फायबर लास्ट माईल कनेक्टिव्हिटीची अडचण कमी करेल. प्लॅन घेणाऱ्या ग्राहकांना अत्याधुनिक वाय-फाय राउटर, 4K स्मार्ट सेट-टॉप बॉक्स आणि व्हॉइस अॅक्टिव्ह रिमोट मोफत दिले जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts