ताज्या बातम्या

Jio New Plan : जिओने दिली वापरकर्त्यांना गुडन्यूज! मोफत पाहता येणार IPL, जाणून घ्या शानदार ऑफर

Jio New Plan : यंदाच्या मोसमतील आयपीएलच्या सामान्यांना उद्यापासून सुरुवात होणार आहे. आयपीएलचा पहिला सामना हा गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. तुम्ही हे सामने OTT प्लॅटफॉर्म तसेच टीव्हीवर पाहू शकता.

अशातच टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. कारण आता या ग्राहकांना मोफत आयपीएलचा आनंद घेता येणार आहे. दरम्यान रिलायन्स जिओची ही काय ऑफर आहे? त्यासाठी ग्राहकांना कोणत्या अटींचे पालन करावे लागणार आहे? जाणून घ्या.

आता या वापरकर्त्यांना मोफत पाहता येणार IPL

सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशातील Jio Cinema हे IPL 2023 चे अधिकृत लाइव्ह-स्ट्रीमिंग भागीदार असणार आहे. इतकेच नाही तर आता Airtel, Jio, VI आणि BSNL चे सर्व वापरकर्ते सर्व IPL सामने विनामूल्य ऑनलाइन पाहू शकतात, त्याचा आनंद घेऊ शकतात. याचा अर्थ असा की तुम्ही कोणत्या टेलिकॉम कंपनीचे वापरकर्ते आहात याची कोणतीही काळजी न करता तुम्ही JioCinema अॅपद्वारे Tata IPL 2023 ऑनलाइन सहज पाहू शकता.

या भाषांमध्ये पाहता येईल आयपीएल

जिओ सिनेमावर तुम्ही मराठी, तमिळ, इंग्रजी, हिंदी, तेलुगू, गुजराती, बंगाली आणि भोजपुरी अशा 12 वेगवेगळ्या भाषांमध्ये या सामन्याचा आनंद घेऊ शकता. इतकेच नाही तर आता अॅपवरील कॉमेंट्रीची भाषाच बदलणार नाही, तर तुमच्या मोबाइलवरील आकडेवारी आणि ग्राफिक्सही तुमच्या पसंतीच्या भाषेत तुम्हाला पाहता येणार आहे.

खेळवले जाणार 74 सामने

यंदाच्या मोसमातील इंडियन प्रीमियर लीग 2023 ही उद्यापासून म्हणजे 31 मार्चपासून सुरू होत आहे. IPL ची पहिली लढत ही गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. यंदाच्या मोसमात एकूण 74 सामने खेळवले जाणार असून तुम्ही जिओ सिनेमा अॅपवर हे सर्व आयपीएल सामने पाहू शकता.

इतकेच नाही तर आता तुम्हाला वेगवेगळ्या कोनातूनही सामना पाहता येणार आहे. म्हणजेच तुम्ही फोनचा कॅमेरा अँगल बदलून IPL चा आनंद घेऊ शकता. सध्या 52 दिवसीय क्रिकेट परिषदेत एकूण 10 संघांचा सहभाग असणार आहे. या मोसमात एकूण 70 लीग सामने आणि तर चार प्लेऑफ सामने खेळवले जाणार आहेत. तसेच 18 डबल हेडर (एका दिवसात दोन सामने) असणार आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts