Jio Plan Offer : टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एकापेक्षा बेनिफिट्स प्लॅन्स ऑफर करत असतात. त्यात इतर टेलिकॉम कंपन्यापेक्षा रिलायन्स जिओची लोकप्रियता खूप आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन रिचार्ज प्लॅन्स ऑफर करते.
Jio OTT ची आवड असणाऱ्यांसाठी अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. महत्त्वाचे म्हणजे रिलायन्स जिओ आपल्या सर्व प्लॅन्समध्ये Jio TV, Jio Security, Jio Cinema, Jio Cloud सारख्या Jio अॅप्सचे सबस्क्रिप्शन ऑफर करते. दरम्यान, कंपनीने असेच दोन प्लॅन आणेल आहेत ज्यात तुम्हाला डेटासह मोफत डिस्ने + हॉटस्टार सदस्यता मिळेल. जाणून घ्या प्लॅन.
रिलायन्स जिओचा 808 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
आता रिलायन्स जिओच्या ग्राहकांना 808 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता मिळेल. यात तुमच्यासाठी कंपनीकडून डिस्ने हॉटस्टारचे ३ महिन्यांसाठी मोफत सबस्क्रिप्शन देण्यात आले आहे. तसेच, या प्लॅनमध्ये 2GB इंटरनेट डेटा मिळत आहे.
जो एकूण 168GB डेटासह येईल. यात तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएसचा लाभ मिळेल आणि महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला Jio Cinema, Jio TV, Jio Cloud आणि Disney Plus Hotstar चे मोबाईल सबस्क्रिप्शन या प्लॅनमध्ये मिळेल.
रिलायन्स जिओचा 758 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
हा रिलायन्स जिओचा मूळ प्लॅन असून जो 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. यात कंपनीच्या ग्राहकांना 1.5 जीबी हायस्पीड डेटा आणि डिस्ने प्लस हॉटस्टारचे ३ महिन्यांसाठी मोफत सबस्क्रिप्शन मिळाले. हे लक्षात घ्या की कंपनीच्या 758 रुपयांच्या प्लॅनच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला दररोज 1.5 GB हाय स्पीड इंटरनेट डेटा मिळेल.
तसेच, तुम्हाला 3 महिन्यांसाठी Disney Plus Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. समजा तुम्ही असा रिचार्ज प्लॅन शोधत असाल ज्यात तुम्हाला अधिक वैधता, अधिक डेटा आणि अनेक फायदे मिळतील. तर तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन या प्लॅनचा तुम्ही त्याचा पुरेपूर फायदा घेऊ शकता आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना याबद्दल सांगू शकता.