ताज्या बातम्या

Jio Postpaid Plan : जिओचा ‘हा’ भन्नाट प्लॅन एकाच वेळी 4 जणांना वापरता येणार, जाणून घ्या

Jio Postpaid Plan : जिओ पोस्टपेड युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. जिओ पोस्टपेड युजर्स आता फ्रीमध्ये Netflix आणि Amazon Prime मोफत (Free) पाहू शकणार आहेत. (Jio Postpaid Plan)

जिओच्या पोर्टफोलिओमध्ये बऱ्याच विशेष योजना आहेत. कंपनी एका प्लॅनमध्ये चार लोकांना सेवा वापरण्याची परवानगी देते. यामध्ये युजर्सना डेटा, कॉलिंग आणि एसएमएससह OTT प्लॅटफॉर्मवरही प्रवेश मिळत आहे.

या प्लॅनमध्ये चार लोक Jio च्या सेवा वापरू शकतात. Jio पोस्टपेड प्लस पोर्टफोलिओमध्ये (portfolio) एकूण 5 योजना आहेत. जर तुम्हाला चार लोकांसाठी प्लॅन हवा असेल तर कंपनीचा सर्वात स्वस्त रिचार्ज 999 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना डेटा, कॉलिंग आणि एसएमएससोबत इतर अनेक फायदे मिळतात.

जिओच्या ९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये काय मिळेल?

999 रुपयांच्या Jio रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना 200GB डेटा मिळतो. डेटा लिमिट संपल्यानंतर यूजर्सला 10 रुपये प्रति जीबी दराने डेटा मिळेल. आधीच नमूद केल्याप्रमाणे, या प्लॅनमध्ये, मुख्य वापरकर्त्याशिवाय, आणखी तीन कनेक्शन त्यांचा फोन वापरू शकतात.

म्हणजेच या प्लॅनमध्ये एकूण चार लोक जिओची सेवा वापरू शकतील. कंपनी या प्लॅनसह इतर तीन सिम कार्ड देईल. तुम्ही ही सिम तीन लोकांना देऊ शकता.

999 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज 100 एसएमएस आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंग सेवा मिळेल. रिचार्ज प्लॅनमध्ये 200 GB डेटा उपलब्ध आहे. या प्लानमध्ये यूजर्सना 500GB पर्यंत डेटा रोलओव्हर मिळेल.

OTT प्लॅटफॉर्मला सबस्क्रिप्शन मिळेल

या रिचार्ज प्लॅनसह वापरकर्त्यांना Amazon Prime, Netflix, Disney + Hotstar, JioTV, Jio Security आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन मिळेल. जर तुम्ही हा प्लॅन पहिल्यांदा खरेदी करत असाल तर Jio 99 रुपये अतिरिक्त आकारेल. हे शुल्क जिओ प्राइम मेंबरशिपसाठी आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts