Jio Prepaid Plan : जिओने गुपचूप लाँच केले 6 नवीन प्लॅन, मोफत Disney + Hotstar सबस्क्रिप्शनसह घेता येईल डेटाचा लाभ

Jio Prepaid Plan : रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी 6 नवीन प्लॅन लाँच केले आहेत. ज्यात तुम्हाला मोफत Disney + Hotstar सबस्क्रिप्शनसह डेटाचा लाभ घेता येईल. विशेष म्हणजे रिलायन्स जिओचे हे प्लॅन तुमच्या बजेटमध्ये येतील.

कंपनीच्या पहिल्या प्लॅनची किंमत 328 रुपये, दुसऱ्या प्लॅनची ​​किंमत 388 रुपये, तर तिसऱ्या प्लॅनची ​​किंमत 758 रुपये आहे, चौथ्या प्लॅनची ​​किंमत 808 रुपये पाचव्या प्लॅनची ​​किंमत 598 रुपये आणि शेवटच्या रिचार्ज प्लॅनची ​​किंमत 3178 रुपये आहे.

जाणून घ्या रिचार्ज प्लॅनचे फायदे

रिलायन्स जिओच्या 328 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांची वैधता मिळत असून या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १.५ जीबी डेटा मिळत आहे. या प्लॅनमध्ये डिस्ने प्लस हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन ३ महिन्यांसाठी दिले जाते. समजा तुम्ही 388 रुपयांचा प्लॅन घेतला तर तुम्हाला 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2GB डेटाचा लाभ घेता येईल.

तसेच या प्लॅनमध्ये 3 महिन्यांचे Hotstar सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. महत्त्वाचे म्हणजे 758 रुपयांच्या नवीनतम प्लॅनमध्ये, ग्राहकांना 84 दिवसांच्या वैधतेसह 1.5GB दैनिक डेटा मिळेल. आनंदाची बाब म्हणजे या प्लॅनमध्ये डिस्ने प्लस हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन ३ महिन्यांसाठी मिळेल.

तुम्ही जास्त डेटा वापरत असल्यास तर तुम्ही 808 रुपयांचा प्लॅन खरेदी करू शकता. या प्लॅनमध्ये तुम्हाला 84 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा मिळेल. कंपनीच्या ग्राहकांना 3 महिन्यांसाठी डिस्ने प्लस हॉटस्टार सबस्क्रिप्शन मिळेल.

कंपनीने आणखी दोन प्लॅन्स सादर केले आहेत ज्यात कंपनीच्या ग्राहकांना 1 वर्षासाठी डिस्ने प्लस हॉट स्टारचे सबस्क्रिप्शन मिळेल. यातील पहिला प्लॅन 598 रुपयांचा असून त्याची वैधता 28 दिवसांची आहे, तो दररोज 2GB डेटा ऑफर करतो. तसेच कंपनीने 3178 रुपयांचा प्लॅन सादर केला आहे. यात ग्राहकांना 365 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा मिळेल. यात एका वर्षासाठी Hostar चे सबस्क्रिप्शन मिळेल.

एअरटेलने लाँच केले प्लॅन

एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी क्रिकेट विश्वचषकासंदर्भात खास रिचार्ज प्लॅन ऑफर आहेत. एअरटेलने सर्व प्रीपेड ग्राहकांसाठी एक विशेष डेटा पॅक लाँच केला असून ग्राहकांना आता 99 रुपयांमध्ये 2 दिवसांसाठी अनलिमिटेड डेटाचा लाभ घेता येईल. तर 49 रुपयांमध्ये 6 GB डेटा 1 दिवसासाठी उपलब्ध असणार आहे. तसेच एअरटेल स्पेशल डीटीएच रिचार्ज ऑफरसाठी स्टारसोबत करार करत असून कंपनीने स्टार स्पोर्ट्स लॉन्च केले आहेत.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts